अकोल्यात लाडक्या बाप्पाला आणण्यासाठी उसळली गर्दी

अकोल्यातील बाजारपेठ गणपतीच्या आगमनाने फुलून गेल्या आहेत.
अकोल्यात लाडक्या बाप्पाला आणण्यासाठी उसळली गर्दी
अकोल्यात लाडक्या बाप्पाला आणण्यासाठी उसळली गर्दीजयेश गावंडे

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील Akola बाजारपेठ गणपतीच्या Lord Ganesh आगमनाने फुलून गेल्या आहेत. अकोल्यातील टॉवर जवळच्या अकोला क्रिकेट मैदानावर गणेश मूर्ती खरेदीसाठी गर्दी जमली आहे.

हे देखील पहा-

यावर्षी बाप्पाच्या कृपेने अकोलेकरांवरील कोरोनाचं Corona Wave ढग काहीसं दूर झालेलं आहे. तसेच आज पावसाने Rain सुद्धा उघडीप दिली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी जणू वरुणराजाने सुद्धा आपला रोष आवरता घेतला आहे. त्यामुळे अकोल्यात लाडक्या बाप्पाच्या स्वागताच्या जय्यत तयारीत आगमन होत आहे.

अकोल्यात लाडक्या बाप्पाला आणण्यासाठी उसळली गर्दी
Ganeshotsav 2021: जालण्यात राजेश टोपे यांच्या घरीही बाप्पाचं आगमन

सकाळपासूनच भाविकांनी बाजारपेठेत Akola Market गणपतींच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. शहरातील जठरपेठ, एसीसी मैदान, गांधी मार्ग आदी परिसरात गणेश मूर्तींची दुकाने थाटण्यात आली आहे. या परिसरात गणेशाच्या मूर्ती, मखर, सजावटीचे साहित्य, फुलं, दुर्वा आदींची दुकाने थाटण्यात आली आहे.

मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला होता त्यामुळे दुकानांची संख्याही कमी होती. यंदा मात्र कोरोनाचे मळभ काहीसे दूर झाले आहेत त्यामुळं भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com