नागपूरच्या ताजबाग परिसरात मुस्लिम नागरिकांची तुफान गर्दी; कोरोना नियमांना हरताळ!

दर्गा बंद असूनही उर्स असल्याच्या कारणाने दर्ग्याच्या परिसरामध्ये मुस्लीम नागरिकांची प्रचंड गर्दी आज दिसून आली.
नागपूरच्या ताजबाग परिसरात मुस्लिम नागरिकांची तुफान गर्दी; कोरोना नियमांना हरताळ!
नागपूरच्या ताजबाग परिसरात मुस्लिम नागरिकांची तुफान गर्दी; कोरोना नियमांना हरताळ!SaamTV

नागपूर : नागपूरच्या Nagpur ताजबाग Tajbag परिसरात मुस्लीम बांधवांची तुफान गर्दी जमा झाल्याचे चित्र आज पहायला मिळाले ताजबाग परिसरात 'उर्स' सुरु आहे या उर्ससाठी नागपूरमधील मुस्लीम नागरिकांनी येथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती.A crowd of Muslim citizens in the Taj Bagh area of ​​Nagpur

हे देखील पहा-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताजबाग दर्गा प्रशासनाने भाविकांसाठी बंद ठेवला आहे आणि दर्गा बंद असूनही उर्स असल्याच्या कारणाने दर्ग्याच्या परिसरामध्ये मुस्लीम नागरिकांची Muslim citizens प्रचंड गर्दी आज दिसून आली. आत्ता कुठे कोरोनाचा corona प्रादुर्भाव कमी झाला आहे अशातच अधूनमधून कोरोना रुग्णांची Corona Patients संख्या वाढतच आहे. शिवाय तज्ञांच्या म्हणण्यानुसार तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहेच मग या लोकांना कोरोनाची भिती आहे की नाही ? प्रशासनाच्या सर्व नियमांचे उल्लंघनच करायचे आहे का? आणि प्रशासनाची कसलीच भिती लोकांना कशी नाही? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहेत आणि असेच जर सर्व लोक कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निष्काळजीपणा करणार असतील तर आपण कोरोनाची तिसरी लाट रोखणार कशी असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

नागपूरच्या ताजबाग परिसरात मुस्लिम नागरिकांची तुफान गर्दी; कोरोना नियमांना हरताळ!
तालिबानचा खरा चेहरा समोर! महाविद्यालयात मुला -मुलींमध्ये लावला पडदा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती निर्बंध?

एकीकडे ही गर्दी तर दुसरीकडे येऊ घातलेल्या गणेशोत्सवामध्ये होणारी गर्दी रोखण्यासाठी नागपुर मध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवरती नविन निर्बंध लावण्यात येतील असे संकेत पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. चेंबर ऑफ कॉमर्सच्या लोकांना विचारुन निर्बंध लावण्यासबंधी येत्या दोन तीन दिवसांमध्ये निर्णय घेणार असल्याचही राऊत म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com