मालकाच्या सुरात सूर मिसळून गाणी गाते जिमी नावाची कुत्री

पाचगणी येथील त्यांच्या घरामध्येच ते नवनवीन गाणी तयार करणे त्याला चाल लावणे असे अनेक प्रयोग सुरू असतात.
मालकाच्या सुरात सूर मिसळून गाणी गाते जिमी नावाची कुत्री
मालकाच्या सुरात सूर मिसळून गाणी गाते जिमी नावाची कुत्री ओंकार कदम

महाबळेश्वर तालुक्यांमधील पाचगणी (Mahabaleshwar Panchgani) येथील सागर भिलारकर (Singer Sagar Bhilarkar) यांची एक नामांकित संगीतकार म्हणून मोठी ख्याती आहे. व्यवसायिक ऑर्केस्ट्रा कराओके त्याचबरोबर स्वतः वेगवेगळी 25 प्रकारची वाद्य एकाच सिंथेसायझर पियानो मधून वाजवतात तसेच स्वतः गाणी म्हणतात त्यामुळे एक उत्कृष्ट गायक व कलाकार म्हणून ते महाबळेश्वर तालुक्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात परिचित आहेत.

पाचगणी येथील त्यांच्या घरामध्येच ते नवनवीन गाणी तयार करणे त्याला चाल लावणे असे अनेक प्रयोग सुरू असतात. त्यांच्या घरामध्ये 10 वर्षांपासून जिमी नावाची एक कुत्री त्यांनी पाळलेली आहे. विशेष म्हणजे सागर यांचा रियाज ऐकून ऐकून आता जिमी सुद्धा त्यांच्या सुरात सूर मिसळून गाणी गाते.

मालकाच्या सुरात सूर मिसळून गाणी गाते जिमी नावाची कुत्री
गोव्यासह कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी

घरात ज्या वेळी ते रियाज करत असतात त्यावेळी सागर जेव्हा गाणं म्हणतात त्यावेळी त्याच्याच सुरात हुबेहूब जिमी देखील आपल्या मंजुळ आवाजात त्या सुरा सुर हुबेहुब काढत सागरला साथ देते तिच्या आवडीचं गाणं लागलं की ती आवर्जून स्वतः गाणं म्हणते. ज्या प्रमाणे सागर गाण्यातील चढ उतार घेत असतात त्याच प्रमाणे जिमी सुद्धा आवाजात वेगवेगळे चढ उतार घेते. सागर तर एक उत्तम कलाकार आहेतच परंतु न बोलता येणाऱ्या मुक्या प्राण्यांना सुद्धा गाण्यातील भावना समजतात आणि व्यक्त कराव्या वाटतात हे जिमी चे गाणे ऐकून पाहायला मिळते.

गेली 10 वर्षे जिमी सागर यांच्या कडे आहे अगदी घरातल्या एका सदस्य प्रमाणेच तिचा घरात वावर असतो आणि विशेष म्हणजे जिमी कोणत्याही गाण्यावर किंवा कोणीही गाणे म्हणत असेल तर सुरात सूर मिसळते असं अजिबात नाही तर जेव्हा तिच्या आवडीचे गाणे लागते किंवा गाणे गाणारा व्यवस्थित गाणे म्हणतो तेव्हाच जिमी स्वतः पण साथ देते.कुत्रे रडले की आज ही अशुभ मानले जाते परंतु जिमी च्या गायनाच्या या अनोख्या अंदाजाने कुत्र्याला ही गाता येते तसेच मुक्या जनावरांना देखील भावना असतात आणि त्या व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात ते फक्त आपल्याला समजून घेता आले पाहिजे हे आता लोकांना समजेल.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com