औरंगाबाद हादरलं! मुलीचे कन्यादान केल्यानंतर 2 दिवसात पित्याची तलावात उडी घेऊन आत्महत्या

मुलीचे लग्न आनंदात पार पडले, यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असताना अचानक मुलीच्या वडिलांचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली
औरंगाबाद हादरलं! मुलीचे कन्यादान केल्यानंतर 2 दिवसात पित्याची तलावात उडी घेऊन आत्महत्या
औरंगाबाद हादरलं! मुलीचे कन्यादान केल्यानंतर 2 दिवसात पित्याची तलावात उडी घेऊन आत्महत्या Saam Tv

अविनाश कानडजे

औरंगाबाद: मुलीचे लग्न आनंदात पार पडले, यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असताना अचानक मुलीच्या वडिलांचा मृतदेह सापडल्यामुळे (Fathers) खळबळ उडाली आहे. या घडलेल्या घटनेमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. मंगलकार्य घरी पार पडले असताना घडलेल्या या प्रकाराने दोन्ही कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. हा प्रकार औरंगाबादच्या (Aurangabad) वाळूज (Waluj) महानगरात घडला आहे. साजापूरच्या (Sajapur Aurangabad) तलावात मुलीच्या पित्याचा मृतदेह आढळला आहे. (a few days after girls marriage her fathers body was found pond aurangabad)

हे देखील पहा-

समीर चांदशाह असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत समीर हे पत्नी शाहिनबी आणि मुलगा साहिल आणि मुलगी सानिया यांच्याबरोबर साजापुरामध्ये वास्तव्यास होते. समीर हे मुळात चांदवड (Chandwad) जिल्हा नाशिकचे (Nashik) असून साजापुरात कामानिमित्त आले आणि स्थायिक झाले होते. ते वाहनचालक असून विविध कामे करून आपल्या कुटुंबाचा उदर्निवाह करत होते. त्यांनी आपल्या मुलीचे सानियाचे लग्न समीर शेख या तरुणाशी १८ फेब्रुवारी दिवशी लावून दिले. यानंतर मुलीच्या सासरी रिसेप्शन कार्यक्रम असल्याने समीर चांद शाह कुटुंब मुलीच्या सासरी ढोरकीनला या गावात रविवारी गेले होते. नंतर सगळे परत आले. लग्नात धावपळीचा थकवा असल्यामुळे कुटुंबीय आणि नातेवाईक झोपी गेले होते. सकाळी उठून बघितले असता समीर चांद शाह हे घरात नव्हते.(Aurangabad Crime)

औरंगाबाद हादरलं! मुलीचे कन्यादान केल्यानंतर 2 दिवसात पित्याची तलावात उडी घेऊन आत्महत्या
राजधानी कीव्हमध्ये रशियाकडून बाँम्ब हल्ले; भारतीय 20 हजार कुटुंबियांना मार्गदर्शक सूचना जारी

कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर (mobile) फोन लावला पण त्यांचा फोन लागत नव्हता. कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी त्यांचा खूप शोध घेतला. तरी देखील ते सापडले नाही. मंगळवारी साजापूरच्या तलावामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याचे काही लोकांनी वाळूज पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. मृतदेहाजवळ असलेले कागदपत्रावरून ते समीर शाह असल्याचे समजले आहे. समीरच्या कुटुंबियांना हे आहे समजताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेने सासर आणि माहेरच्या गावात शोककळा पसरली आहे. समीर यांच्याविषयी नेमकं काय झालं? या संदर्भात आजून देखील कोणतीही माहिती मिळाली नाही. वाळुंज पोलीस ठाण्यात हे प्रकरण नोंदवले आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com