ऐन संचारबंदीत मित्राने केली मित्राची हत्या; थरकाप उडवणारी घटना

दरम्यान अमरावतीमध्ये सध्या संचारबंदी सुरु आहे. आज दुपारी २ ते ४ यावेळेत संचारबंदीमध्ये सुट देण्यात आली आहे.
ऐन संचारबंदीत मित्राने केली मित्राची हत्या; थरकाप उडवणारी घटना
ऐन संचारबंदीत मित्राने केली मित्राची हत्या; थरकाप उडवणारी घटना Saam TV

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील हृदयाला थरकाप सोडणारी घटना घडली आहे. परतवाडा शहरात संचारबंदी असताना हत्या झाल्याची घटना घडली आहे. दोन मित्रात आपसात वाद झाला, त्यातील एका मित्राला आपला जीव गमवावा लागला आहे. निखिल मंडले असे मृतकाचे नाव आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार व्यक्तिगत वादातून हत्या झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी विक्की धाडसे यास अटक केली आहे. तर या संदर्भात अधिक तपास परतवाडा पोलीस करत आहेत. या घटनेने मात्र परतवाडा शहर हादरून गेले आहे.

दरम्यान अमरावतीमध्ये सध्या संचारबंदी सुरु आहे. आज दुपारी २ ते ४ यावेळेत संचारबंदीमध्ये सुट देण्यात आली आहे. त्रिपुरामधल्या एका कथित घटनेवरून रझा अकादमीने काढलेल्या मोर्चावेळी अमरावती, नांदेड आणि मालेगाव जाळपोळ झाली. त्यानंतर भाजपने एक दिवसाचा बंद पुकारला होता त्यालाही गालबोट लागलं होतं. त्यानंतर संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले. एका बाजूला अमरावतीमध्ये हिंसाचार होत आहे तर दुसऱ्या बाजूला हत्येसारख्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे कुठेतरी पोलीस यंत्रनेवरचा ताण वाढला आहे असं म्हणावं लागेल.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com