Jalna Crime: शेतकऱ्यांच्या जनावरांची चोरी करुन कत्तलखान्यात विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Animal Theft Gang Arrested In Jalna : जनावरांची कत्तल करण्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड, सुरी, लोखंडी रॉड असे साहित्य जप्त करत त्यांना अटक केली आहे.
Animal Theft Gang Arrested In Jalna
Animal Theft Gang Arrested In JalnaSaam TV

जालना: जालना शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून शेतकऱ्यांच्या दावणीला बांधलेल्या जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहरात छापमारी करत दोघांना ताब्यात बेड्या ठोकल्या आहे. तसेच जनावरे चोरी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या महिंद्रा झायलो कार ही जप्त करत २४ गुन्हे उघड केले आहेत. (Jalna Crime News)

हे देखील पाहा -

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, सदर बाजार पोलीस ठाण्यांतर्गत कलम 379 भादंविप्रमाणे दाखल असलेल्या गुन्हात चोरीस गेलेल्या दोन गायी ह्या सिल्लोड येथील जनावर चोरी करणारे सक्रीय टोळीने चोरी केली असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची सिल्लोड शहरात जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेतला असता त्यांना जुनेद ताहेर कुरेशी हा स्नेहनगर सिल्लोड या ठिकाणी आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपल्या इतर १३ सहकाऱ्यांसह जालना जिल्ह्यातून गेल्या सहा महिन्यात २४ ठिकाणाहून जनावरांची चोरी केल्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून जनावर चोरी करतांना वापरण्यात आलेल्या १२ लाख किंमतीच्या दोन महिंद्रा झायलो कार जप्त केल्या आहेत. तसेच त्यांनी चोरी केलेली जनावरे आपण शेख मेहबुब सुबराती, इदगाहनगर सिल्लोड याला विक्री करत असल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी शेख मेहबुब सुबराती याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जनावरांची कत्तल करण्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड, सुरी, लोखंडी रॉड असे साहित्य जप्त करत त्यांना अटक केली आहे. दरम्यान पोलिसांनी शहरातील सदर बाजार, कदीम जालना, तालुका पोलीस ठाणे, चंदणझिरा, बदनापूर पोलीस ठाण्याचा अभिलेकखाची तपासणी केली असता या टोळीने कबुली दिल्याप्रमाणे २४ गुन्हे उघड झाले आहेत.

Animal Theft Gang Arrested In Jalna
Sanjay Raut |रडायचं नाही लढायचं; संजय राऊत यांनी ईडी कोठडीतून लिहिले विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र

गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या दावणीला बांधलेल्या जनावरांच्या चोरीच्या घटनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या आदेशावरून या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर जालना पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला असल्याने जनावरे चोरी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहे. गेल्या चार दिवसात जालना पोलिसांनी तिसरी मोठी कारवाई केल्याने शेतकरी वर्गातून व पशुपालक वर्गातून समाधान व्यक्त केलं जात आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com