नाम फाउंडेशन कडून आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात

या कुटुंबाला छोटासा आधार देण्यासाठी नाम फाउंडेशनने पुढाकार घेऊन त्यांना २५०००/- पंचेवीस हजार रुपयांची मदत केली आहे.
नाम फाउंडेशन कडून आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात
नाम फाउंडेशन कडून आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदतीचा हातदीपक क्षीरसागर

लातूर - जिल्ह्यातील उदगीर Udgir तालुक्यातील हेर येथील अभंग संग्राम गरुडे यांनी सततची नापिकी, वाढलेला कर्जबाजारीपणा आणि दवाखान्याचा खर्च Hospital या विवंचनतेनुन स्वतःचे आयुष्य संपवून टाकले होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी छाया संग्राम गरुडे तसेच तीन अपत्य असून दोन मुले व एक मुलगी दिव्यांग आहेत. या कुटुंबाला छोटासा आधार देण्यासाठी नाम फाउंडेशनने Nama Foundation पुढाकार घेऊन त्यांना २५०००/- पंचेवीस हजार रुपयांची मदत केली आहे. A helping hand from the Nama Foundation

हे देखील पहा -

सदरील कुटुंबाच्या घरातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे कुटुंबावर हलाखीची परिस्थिती ओढवली आहे. त्यांना मदत करण्यासाठी, छोटासा आधार देण्यासाठी नाम फाउंडेशनने पुढाकार घेऊन त्यांना २५०००/- पंचेवीस हजार रुपयांची मदत केली आहे. मदतीचा चेक मिळाल्यानंतर या कुटुंबाने नाम फाउंडेशनचे मनापासून आभार व्यक्त केले. A helping hand from the Nama Foundation

नाम फाउंडेशन कडून आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात
नाशिकच्या प्रेस नोटमधून 5 लाखांच्या नोटा गायब !... (पहा व्हिडीओ)

तसेच याप्रसंगी उपस्थित असलेल्या फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी या कुटूंबाला आर्थिक मदत देण्यासोबत मानसिक आधार सुद्धा दिला व इथून पुढेही या कुटूंबाला मदत करण्यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील असेल असा आशावाद व्यक्त केला. यावेळी नाम फाऊंडेशनचे विलास चामे, ज्ञानेश्वर चेवले, रामकिशन नादरगे, रामलिंग शेरे, विनायक बेंबडे, भागवत गडीमे, बुद्धभूषण बानाटे, अविनाश सूर्यवंशी उपसरपंच तुळशीराम बेंबडे विलास कांबळे उपस्थित होते.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com