Chandrapur News : बापरे! अख्खं घर थेट ७० फूट खोल जमिनीत गेलं; पाहा थरारक VIDEO

घुग्गुस गावात एक मोठं घर अचानक ७० फूट जमिनीमध्ये गडप झालं
Chandrapur Guggus Village
Chandrapur Guggus VillageSaam TV

चंद्रपूर : राज्यात एकीकडे बैलपोळ्याचा सण उत्सवात साजरा केला जात असताना, दुसरीकडे चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली. चंद्रपूर शहरालगतच्या घुग्गुस गावात एक मोठं घर अचानक ७० फूट जमिनीमध्ये गडप झालं. कोसळा खाणींचा भाग असलेल्या आमराई वार्डात हा प्रकार घडलाय. या थरारक घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. (Chandrapur Todays News)

Chandrapur Guggus Village
Parbhani News : जिंतूर तालुक्यात बैलपोळ्याला गालबोट; दोन गटात तुफान हाणामारी, पाहा VIDEO

नेमकं काय घडलं?

प्राप्त माहितीनुसार, आमराई वार्डात गजानन मडावी यांचं घर होतं. घरातील सदस्य कामात असताना त्यांना अचानक घर हलू लागल्याचं लक्षात आलं. घरात कंपन होऊ लागल्याने घरातील सदस्यांनी बाहेर धाव घेतली. दरम्यान, घरातून बाहेर पडताच हे घर ७० फूट जमिनीत गडप झालं.

काही क्षणातच उभं असलेलं अख्ख घर ७० फूट जमिनीत गडप झाल्याने आसपासच्या नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ देखील परिसरातील नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, काही क्षणातचं उभं असलेलं घरी ७० फूट जमिनीत गाडलं गेलं. (Chandrapur Latest News)

दरम्यान, सरकारी कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या खाणीमुळे या परिसरात अनेकदा घरे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशा पद्धतीने एकच घर ७० फूट खोल जमिनीत गडप होण्याची ही पहिलीच घटना आहे. घटनास्थळी महसूल-खाण प्रशासन व पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. सध्या परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com