Buldhana Fire : खामगावातील फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

Buldhana Fire : आगीची माहिती मिळताच खामगाव येथील अग्नीशमन विभागाचे (Fire Brigade) कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
Buldhana Fire : खामगावातील फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
A huge fire broke out at a firecracker warehouse in Khamgaonसंजय जाधव

बुलढाणा: खामगाव येथील जनुना शिवारातील एका खासगी फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. ही भीषण आग (Fire) आज दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान लागली. या आगीत गोदामातील (warehouse) मोठ्या प्रमाणात फटाक्याचा (firecracker) भक्कम साठा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने आकाशात सर्वदूर धुराचे लोट पसरले होते.

हे देखील पाहा -

खामगाव (Buldhana) नजीक जमुना तलाव रोडवरील शिवारात फटाक्यांचे एक खासगी गोदाम आहे. या गोदामाला दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत गोदामातील मोठ्या प्रमाणात फटाक्याच्या साठ्याने पेट घेतल्याने प्रचंड धुराचे लोट आकाशात सर्वदूर पसरले. त्याचवेळी फटाके फुटल्याचे आवाजही जनुना शिवारासह परिसरात सर्वत्र ऐकू येत होते. फटाक्यांच्या गोदामांला आग लागल्याची माहिती मिळताच जनुना आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीकोनातून खामगाव शहरातून जनुनाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला.

A huge fire broke out at a firecracker warehouse in Khamgaon
मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष कालच्या सभेने नाराज; शिवसेनेत करणार प्रवेश

आगीची माहिती मिळताच खामगाव येथील अग्नीशमन विभागाचे (Fire Brigade) कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नीशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी लावण्यात आले. तत्पूर्वी प्रत्यक्षदर्शींनी आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अग्नीशमन दलासोबतच आरोग्य विभागाकडून रूग्णवाहिकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.