अहमदनगर-मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने खड्यात बसून आंदोलन

अहमदनगरच्या राहुरी कारखाना येथे नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी खड्यात बसून आंदोलन केले आहे.
अहमदनगर-मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने खड्यात बसून आंदोलन
अहमदनगर-मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने खड्यात बसून आंदोलनगोविंद साळुंके

अहमदनगर: अहमदनगरच्या राहुरी कारखाना येथे नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी खड्यात बसून आंदोलन केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नगर-मनमाड महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहे. (A large number of potholes fell on the Ahmednagar-Manmad highway, activities done agitation against government)

हे देखील पहा -

येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना वाट काढत प्रवास करावा लागत आहे. तर अनेकांनी जीव गमावले आहे. त्यामुळे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी खड्ड्यात बसून नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. अनेक राज्यांना जोडणारा नगर- मनमाड महामार्ग असून शिर्डी-शनीशिंगणापूर तीर्थ क्षेत्राला भाविक ये-जा करत असतात. रोज हजारो वाहने या महामार्गावरून धावतात. मात्र रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने अनेक वाहनांचे नुकसान होत आहे. तर अनेकांना जीवही गमवावा लागत आहे.

अहमदनगर-मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने खड्यात बसून आंदोलन
ई-पीक पाहणी शेतकऱ्यांना ठरतेय डोकेदुखी; जाणूण घ्या कारण...

त्यामुळे लवकरात-लवकर रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी नगर-मनमाड रस्ता दुरूस्ती कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला जाग यावी म्हणून खड्ड्यात बसून आंदोलन केलं. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणाणून टाकला.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com