Amravati: नवनीत राणा यांच्या घरी अज्ञात व्यक्तीचे पत्र; पत्रामुळे अमरावतीत खळबळ

काही लोक संदीग्ध लोक राजस्थान सीमेवरून अमरावतीत आले असल्याचा दावा या पत्रात केला आहे.
Navneet Rana News
Navneet Rana NewsSaam TV

अमर घटारे -

अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अमरावती येथील घरी एका अज्ञात हितचिंतकाने पत्र पाठविलं असून या पत्राद्वारे त्याने नवनीत राणा यांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. काही संशयास्पद लोक राजस्थान सीमेवरून अमरावतीत (Amravati) आले असल्याचा दावा या पत्रात केला आहे.

ते लोक तुमच्या घरी जाऊन आले आहेत. मी अल्लाहला दुवा करतो की तुम्हाला काहीही होऊ नये. असं या पत्रात लिहलं असून या पत्रामुळे अमरावतीत एकच खळबळ उडाली आहे. उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांच्या हत्या प्रकरणात आवाज उठवल्यामुळे हे पत्र आल्याचा दावा केला जात आहे.

पाहा व्हिडीओ -

या पत्रामध्ये (Letter) अज्ञात व्यक्तीने लिहलं आहे की, 'मी आपणाला माझं नाव सांगू शकत नाही. मी आपल्या शहरातील एक नागरिक आहे. मी आपणाला सावध करु इच्छितो की, आपण थोडं साभाळून रहा. काही लोक तुमचा पाठलाग करत आहेत. आपण माझी अनेक कामांमध्ये मदत केली आहे. मी एक सरकारी अधिकारी आहे. तुम्ही सांभाळून रहा, आपण माझी बदली केली होती शिवाय कोरोनामध्ये (Corona) माझ्या वडिलांची खूप मदत केली होती.

मी तुम्हाला सांगू इच्छितो की, काही संशयीत लोकं आपला पाठलाग करत असून ते राजस्थान बॉर्डरवरुन अमरावतीमध्ये आले आहेत. शिवाय ते लोक आपल्या घरी येऊन गेले आहेत. तुम्हाला काहीही होऊ नये हिच मी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. या पत्रामुळे आता अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com