Amravati Crime : अल्पवयीन युवती ९ महिन्यांची गर्भवती, असं उघडकीस आलं संपूर्ण प्रकरण

या प्रकरणी आरोपी पतीला अटक
Crime News
Crime NewsSaam TV

अमर घटारे

Amravati Crime News : बालविवाहासह (Child Marriage) अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यासाठी शासकीय आणि सामाजिक पातळीवर विशेष प्रयत्न होत असताना अजूनही हा प्रकार थांबलेला नाही, याची प्रचिती अमरावतीमध्ये (Amravati) आली आहे. एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला. इतकंच नाही तर ती ९ महिन्यांची गर्भवती सुद्धा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

Crime News
Crop Insurance: अतिवृष्‍टीने नुकसान झाले, पंचनामे केले; पिक विम्याची रक्कम मिळेना

२०२१ मध्ये त्यांचा बालविवाह झाल्याची माहिती समोर आली आहे आणि यातूनच अल्पवयीन युवती गर्भवती झाली असल्याच पोलीस तपासात उघडकीस आलेलं आहे. युवतीला प्रसूती करिता जिल्हा स्त्री रुग्णालयात आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला.

पोलिसांनी आरोपी विरुद्ध अत्याचार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. त्यामुळे एकविसाव्या शतकात देखील बालविवाह प्रथा सुरू असल्याचं उघड झालं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

अशी आली घटना समोर...

अमरावतीच्या खोलापुर पोलीस स्टेशन अंतर्गत १७ वर्षीय अल्पवयीन युवती ९ महिन्याची गर्भवती असल्याचा प्रकार पुढे आला आहे. ९ महिन्याची गर्भवती आल्याने युवतीला प्रसूती करिता जिल्हा स्त्री रुग्णालयात दखल करण्यात आलं. यावेळी कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी ही मुलगी 18 वर्षापेक्षा कमी वयाची असल्याचे लक्षात आले. आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com