अबब! कुरीअरच्या बॉक्स मधून चक्क निघाला विषारी 'कोब्रा'

नागपुरातील ज्ञानेश्वर नगर परसरातील घटना
अबब! कुरीअरच्या बॉक्स मधून चक्क निघाला विषारी 'कोब्रा'
अबब! कुरीअरच्या बॉक्स मधून चक्क निघाला विषारी 'कोब्रा'Saam Tv

नागपूर - आपण सर्वच ऑनलाइन पद्धतीने विविध वस्तू घरी बोलावत असतो.  कुरीअरच्या बॉक्समध्ये आपण मागविलेली वस्तू आपल्या घरी येत असतो. मात्र, याच कुरीअरच्या बॉक्स मधून जर विषारी कोबरा निघत असेल, तर तुम्ही काय करणार? नागपुरातील ज्ञानेश्वर नगर परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षक सुनील लखेटे यांच्यासोबत असंच काहीसं घडलं आहे. लखेटे यांची मुलगी बंगळुरूमध्ये नोकरीला आहे. मात्र कोरोनामुळे गेले अनेक महिने ती नागपुरातील घरातूनच वर्क फ्रॉम होम करत आहे. त्यामुळे लखेटे यांनी बंगळुरूमध्ये मुलीची भाड्याची खोली रिकामी करत तिथला साहित्य एका परिचिताच्या माध्यमातून 8 बॉक्सेस मध्ये पॅक करून नामांकित कुरीअर कंपनीच्या माध्यमातून नागपूरला बोलावलं.

हे देखील पहा -

ट्रान्सपोर्ट मधून नागपुरात हे 8 बॉक्सेस आल्यानंतर नागपूर जवळच्या वडधामना येथील कुरिअर कंपनीच्या गोदामात हे बॉक्स ठेवण्यात आले. तिथून काल संध्याकाळी हे बॉक्स लखेटे यांच्या घरी पोहोचले. सुनील लखेटे यांनी एक एक करत तीन बॉक्स उघडले आणि त्याच्यातले साहित्य घरात ठेवले. त्यानंतर दुसरा बॉक्स उघडताच त्याच्यामध्ये सापाची फुत्कार ऐकू आली. त्यामुळे लखेटे यांनी सावध होऊन पाहिले असता. त्यामध्ये मोठा कोब्रा साप गुंडाळी मांडून बसलेला दिसून आला. त्यानंतर पळापळ झाली.

अबब! कुरीअरच्या बॉक्स मधून चक्क निघाला विषारी 'कोब्रा'
साताऱ्यात एसटी संपला लागले गालबोट...

हिमतीने लखेटे कुटुंबीयांनी तोच बॉक्स ओढत अंगणात नेलं. तिथे तो उलटवताच साप त्याच्यातून निघून जवळच्या गटार लाईन मध्ये शिरून गेला. नंतर बोलावलेल्या सर्पमित्रांनी साप शोधण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र तो कोणाला ही सापडला नाही.  मात्र साप थेट बंगळुरू मधून नागपुरात आलाय की कुरिअर कंपनीच्या नागपुरातील गोदामातून बॉक्समध्ये साप आला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com