पोलीस अधिकाऱ्याची एकाला मारहाण करत शिवीगाळ, Video Viral

पेलहार पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याचा शिवीगाळ करतानाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Vasai Virar
Vasai VirarSaam TV

वसई/विरार: वसई-विरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पेलहार पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याचा शिवीगाळ करतानाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. स्टिंग ऑपरेशनमध्ये पोलीस अधिकारी शिवीगाळ करत असल्याचे दिसत आहे. नालासोपारा संतोष भवन परिसरात असलेल्या पेलहार पोलीस ठाण्यात असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक नितीन कोहळी यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. व्याज पटेल हे आपल्या चाळीच्या घराचे प्रकरण घेऊन पेलहार पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण करत शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार पीडित व्यास यांनी छुप्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

नेमका प्रकार काय.

दिवाणी खटला चालू असताना देखील (गैर-गुन्हेगारी कोर्टाचा खटला) पोलीस अधिकारी नितीन कोहळी यांनी जबरदस्ती बोलवून व्यास पटेल यांनी पेलहार पोलीस चौकीत मारहाण केल्याचा आरोप व्यास पटेल यांनी केला आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त यांनी देखील या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com