Washim Bus Fire: द बर्निंग ट्रॅव्हल्सचा थरार! सुदैवाने जीवितहानी नाही, 30 प्रवासी सुखरूप बचावले

ही घटना घडली तेव्हा या मध्ये 30 प्रवासी प्रवास करत होते.
Washim Bus Fire
Washim Bus FireSaam Tv

मनोज जयस्वाल, वाशिम

Washim News: वाशीमच्या जाग माथा परिसरात आज पहाटे 5 वाजेच्या दरम्यान नागपूरवरून नांदेड कडे जाणाऱ्या एका खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना घडली तेव्हा या मध्ये 30 प्रवासी प्रवास करत होते. (Latest Marathi News)

Washim Bus Fire
Jalna Crime News: नात्याला काळिमा! मुलानेच केला आईवर बलात्कार; जालन्यातील मन सुन्न करणारी घटना

दरम्यान आग लागल्याचा प्रकार एका प्रवाश्याच्या लक्षात येताच चालकाला तत्काळ माहिती देताच सर्व प्रवासी खाली उतरले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेमध्ये बस (Bus) जळून राख झाली. या घटनेत कुणीही जखमी झाले नसले तरी मात्र प्रवाश्याच्या साहित्याचा कोळसा झाला आहे. (Washim News)

Washim Bus Fire
Goa Crime News: पती नव्हे हैवान! मित्राला घरी बोलावून पत्नीसोबत केलं भयानक कृत्य

दरम्यान ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. वाहनात अग्निशमन यंत्र नसल्यानं आग विझवता न आल्याची माहिती समोर आली आहे. वाशिम अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याने आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत बस जाळून खाक झाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com