Latur: भीषण अपघात! तरुणाच्या पोटातून लोखंडी रॅड आरपार; एकाचा मृत्यू

मोटारसायकलची पुलाच्या संरक्षण कठड्याला धडक बसली पुलाला आडवा लोखंडी पाईप असल्याने तरुणाच्या पोटातून लोखंडी पाईप आरपार पोटातून बाहेर निघाला.
Latur: भीषण अपघात! तरुणाच्या पोटातून लोखंडी रॅड आरपार; एकाचा मृत्यू
Latur: भीषण अपघात! तरुणाच्या पोटातून लोखंडी रॅड आरपार; एकाचा मृत्यूSaam TV

लातुर जिल्ह्यातील (Latur District) उदगीर तालुक्यातील हाळी जवळ उदगीर नांदेड रोडवर काल सायंकाळच्या सुमारास MH 25 A 7364 या मोटारसायकलचा भीषण अपघात होऊन एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. शंकर तिरुपती शिंदे या तरुणांच्या पोटात पुलावरील लोखंडी पाईप पोटातून आरपार पाच ते सहा फूट घुसून बाहेर निघाला तर अजित भोलन मिश्रा हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. दोघेही तरुण सहारा धाब्यारील कामगार असल्याची माहिती समोर येत आहे. मोटारसायकलची पुलाच्या संरक्षण कठड्याला धडक बसली पुलाला आडवा लोखंडी पाईप असल्याने तरुणाच्या पोटातून लोखंडी पाईप आरपार पोटातून बाहेर निघाला.

Latur: भीषण अपघात! तरुणाच्या पोटातून लोखंडी रॅड आरपार; एकाचा मृत्यू
शेतकरी पुत्राचा यशस्वी प्रयोग, पिकांवर होणार ड्रोनद्वारे फवारणी; पाहा Video

तशाच अवस्थेत तरुण पोटात पाईप घेऊन जखमी अवस्थेत बसला होता या घटनेची माहिती वाढवना पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांनी त्यांच्या पथकास तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पाईप मध्ये अडकलेल्या तरुणांना वाचवण्यासाठी कटरने लोखंडी पाईप कापून तरुणांना पाइप मधून बाहेर काढले अशा गंभीर अवस्थेत तरुणांना तातडीने उपचारासाठी वाढवना प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण वाहिकेमधून उपचारासाठी उदगीर येथे नेण्यात आले असता शंकर तिरुपती शिंदे वय 13 वर्ष राहणार शिरूर ताजबंद या तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अजित भोलन मिश्रा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. अपघात नेमका कसा झाला यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही,

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com