Buldhana News
Buldhana NewsSaam TV

Buldhana News: बुलढाण्यात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

ट्रक चालक गंभीर जखमी असून जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Buldhana News: बुलढाणा येथील मुर्ती फाटा येथे काल (७ डिसेंबर) रोजी एक भीषण अपघात झाला. एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ट्रक चालक गंभीर जखमी असून जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष जोशी असे ट्रक चालकाचे नाव आहे. तर गजानन दातार असे मृत पावलेल्या दुचाकी (Bike) स्वाराचे नाव आहे. बुलढाणा (buldhana) तालुक्यातील साखळी येथील संतोष जोशी आणि चिखली तालुक्यामधील सवणाचे गजानन दातार यांचे परडा शिवारात मेंढयांचे कळप आहेत. ते दोघे बुलढाणा येथून दुचाकीने जात होते. त्यावेळी मुर्ती फाट्यावर त्यांच्या वाहनांची एकमेकांना जोरात धडक बसली.

Buldhana News
Buldhana News: चार गावांची मध्यप्रदेशमध्ये जाण्याची तयारी; मूलभूत सुविधांपासून वंचित गावातील ग्रामस्थांनी घेतला निर्णय

दोन्ही वाहनांची धडक इतकी भीषण होती की यात गजानन (वय५०) दुचाकीवरून रस्त्याच्या कडेला फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यामुळे ते जागीच ठार झाले. तसेच ट्रक चालक संतोष जोशी (वय ३२ ) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने १०८ वाहनाने बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल केले. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या अपघातात संतोश यांच्या पायाचे आणि हाताचे हाड मोडले आहे. त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com