तुमच्यासाठी कायपण! रानावनातनं चिखल तुडवत नवरदेव पोहचला मंडपात

अचानक मध्यरात्रीपासुन पाऊसाला सुरूवात झाली
तुमच्यासाठी कायपण! रानावनातनं चिखल तुडवत नवरदेव पोहचला मंडपात
तुमच्यासाठी कायपण! रानावनातनं चिखल तुडवत नवरदेव पोहचला मंडपात डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : सकाळी लग्न असल्याने, घरात आनंदाचे वातावरण सर्वत्र नातेवाईक, मित्र आतेष्टांना आमंत्रण दिल्याने, सायंकाळीच घरी मांदीयाळी, अन् अचानक मध्यरात्रीपासुन पाऊसाला Rain सुरूवात झाली. गाव अन् मुख्य रस्त्याचा संपर्क तुटून, नवरदेवा सहीत वऱ्हाडी मंडळीवर ३ किलोमिटर रानावनाने चिखलातून Mud वाट काढत मुख्य रस्ता गाठावा लागला आहे.

या नामुष्की ओढवल्याचे चित्र औरंगाबाद Aurangabad जिल्ह्यामधील पैठण Paithan तालुक्यातील दावरवाडी Davarwadi तांडा Tanda या ठिकाणी पाहवयास मिळाले आहे. दावरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत तांडागाव मुख्य गाव सोनवाडी Sonwadi पासून ३ किलोमीटर अंतरावर ३५ उंबऱ्याची वस्ती आहे. ३ आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने लग्नाचा बार उडवून दयावा, म्हणुन शेषराव राठोड यांनी त्यांचा मुलगा अमोल याचा विवाह मंगळवारी (ता. ३१) सुखापूरी (ता.अंबड ) या ठिकाणी करण्याचे ठरविले आहे.

हे देखील पहा-

यासाठी सर्व नातेवाईक- मित्र आप्तेष्टांना देखील बोलविण्यात आले. वऱ्हाड नेण्यासाठी वाहन लावण्यात आले. अन् रात्रीला अचानक धो...धो...पाऊस आला आणि तांडा व मुख्य रस्त्याचा संपर्क तुटला. वाहन गावापर्यंत येत नसल्यामुळे त्याने चक्क ३ किलोमिटरपर्यंत नवरदेवासह वऱ्हाडीना रानावनाने कमी अंतर कापण्यासाठी पिकांतून crops रस्ता काढत गुडघाभर पाणी आणि चिखल तुडवत सोनवाडीजवळ थांबलेल्या मुख्य रस्त्यापर्यंत दमछाक सहन करत जावे लागले आहे.

तुमच्यासाठी कायपण! रानावनातनं चिखल तुडवत नवरदेव पोहचला मंडपात
Video: नवरदेव 103 तर नवरी 23 वर्षांची...

यामध्ये नटलेले नवरदेव, वऱ्हाडी चिखलमातीत भरून, बेनूर झाल्याने दिवसभर हा विषय चर्चेचा बनला. पावसाळ्याची ४ महीने या तiड्यावरील नागरिकांना रस्त्यांसाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागते. शासन सर्व तांडे- वस्त्या मुख्य रस्त्यास जोडण्याची घोषणा करत असले, तरी शेकडो तांडे आणि वस्त्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीतही उपेक्षित आहे. जेथे रस्ता नाही. त्याठिकाणी बसचा विचार न केलेला बरा. येथील पन्नासवर विदयार्थीनी दावरवाडी आणि सोनवाडी या शाळेस जातात. मात्र, अनेकास रस्त्याअभावी शाळा सोडावी लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com