Wardha News: अन् तरुणाचा प्रेमभंग झाला; लग्नाचे आमिष दाखवून तब्बल ९ लाख ५३ हजारांचा गंडा

काही दिवसांनी तरुणीने त्याला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली.
Wardha News
Wardha NewsSaam TV

Wardha News: सोशल मीडियामुळे आज जग फार जवळ आले आहे. मैलो दूर असलेल्या व्यक्तीशी देखील संवाद साधने सहज सोपे झाले आहे. अशात याच सोशल मीडियाचा वापर करून अनेकांची फसवणूक देखील होते. वर्धा येथील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतही फसवणूकीची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फेसबूकच्या माध्यमातून एका तरुणाला लग्नाचे आमिश दाखवून तब्बल ९ लाख ५३ हजारांचा गंडा घातला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येता तरुणाने पोलीस स्टेशन गाठले आणि घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे. कृणाल असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कृणाल प्रतापनगरचा रहिवासी आहे. तो मोबाईल रिपेरींगचे काम करायचा. काही दिवसांपूर्वी एका तरुणीने त्याला फेसबूकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. कृणालने ती रिक्वेस्ट स्विकारली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि रात्रभर गप्पा रंगू लागल्या. हळूहळू मैत्री प्रेमात बदलली गेली. तरुणीने तिचा खोटा फोटो आणि खोटा व्हॉट्सअॅप क्रमांक दिला. तसेच स्वत:ची खोटी माहिती देऊन कृणालला स्वत:च्या जाळ्यात ओढले.

Wardha News
Dhule Love Jihad : धुळ्यात लव्ह जिहादचा प्रकार आला समोर, हिंदू विधवा मुलीची फसवणूक | SAAM TV

कृणाल आणि तरुणीमध्ये लग्नापर्यंत गप्पा पोहचल्या. एकीकडे कृणाल तरुणीशी लग्न करण्याची स्वप्ने पाहत होता. तर दुसरीकडे तरुणीने त्याच्यासाठी वेगळाच सापळा रचला होता. खुललेल्या प्रणयाचा असा प्रेमभंग होईल याची त्याला काहीच कल्पना नव्हती. काही दिवसांनी तरुणीने त्याला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली.

Wardha News
Wardha News : डाळ मिलमध्ये काम करणाऱ्या बालकामगाराचा मृत्यू; हौदात पडल्याने गमवावा लागला जीव

वेगवेगळी कारणे सांगून तिने त्याच्याकडून तब्बल ९लाख ५३ हजार रुपये घेतले. यानंतर तरुणीशी त्याचा काहीच संपर्क झाला नाही. काही दिवस वाट पाहिल्यावर तरुणीने रक्कम न देता त्याची फसवणूक केल्याचे लक्षात येताच कृणालच्या स्वप्नांचा चुराडा झाला. त्याने रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तरुणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com