आळेफाटा पोलिसांनी ७२ तासात लावला छडा; नेवासातील ६ युवकांना अटक

खब-यांच्या माहितीच्या आधारावर पाेलिसांनी ७२ तासात संशयित आराेपींना पकडले.
junnar rural police arrested six youth from nagar
junnar rural police arrested six youth from nagar

जुन्नर : जुन्नर (junnar) तालुक्यातील आळेफाटा येथे पिस्तुलाचा धाक दाखवून इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील रोख रक्कम चोरून नेल्याची घटना सोमवारी (७ डिसेंबर) रात्री साडेदहा वाजता घडली होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले आहे. त्यातील सहा आरोपींना नगर (nagar) येथून पोलिसांनी (police) ताब्यात घेतले आहे अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे (mitesh ghatte) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काही दिवसांपूर्वी चौदानंबर येथील अनंत पतसंस्थेवर भर दुपारी दरोडा पडला होता. त्यामध्ये पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर यांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच बोरी बुद्रुक येथील अविनाश पटाडे यांचे आळेफाटा येथील नगर-कल्याण रस्त्यावर असणा-या साई इलेक्ट्रॉनिक्समध्ये घुसून पटाडे यांना काही युवकांनी बंदुकीचा धाक दाखवित १८ हजार रुपये, मोबाईल व दुचाकीची चावी असा एेवज चाेरी केला हाेता.

या प्रकारामुळे जुन्नर तालुक्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर ग्रामीण पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊ चौकशीचे आदेश दिले होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली होती. ही पथके तपास करत असताना त्यांना आरोपी बँड-डीजे व्यवसायाशी संलग्न असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. पोलिसांनी त्यादिशेने तपास सुरु ठेवला.

junnar rural police arrested six youth from nagar
पुढच्या वर्षी पहिलीत जाणा-या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

७२ तासात लावला छडा

एका खब-याच्या माध्यमातून पाेलिसांनी नगर गाठले. तेथे त्यांनी सहा संशयित आरोपींना नेवासा तालुक्यातून अटक केली (junnar rural police arrested six youth from nagar) वृश्चिकेश बळवंत पंडीत (खरंडी ता.नेवासा), अरबाज नवाब शेख (वडाळा व्हेरोबा ता .नेवासा) वैभव रविंद्र गोरे (खरवंडी ता.नेवासा), राहुल राम चव्हाण (रा.खरवंडी ता.नेवासा , शुभम बाळासाहेब शिंदे (रा.खरवंडी ता.नेवासा) आणि प्रकाश विजय वाघमारे (माळी चिंचोरा ता.नेवासा) या सहा युवकांना ताब्यात घेतले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com