Maharashtra Political News: सरकारमध्ये जिवंतपणा नाही? आप-ठाकरे गटाने थेट दशक्रियेची 'शोक संदेश' पत्रिकाच छापली

चक्क राज्य व केंद्र सरकारच्या दशक्रिया आंदोलनाची ही 'शोक संदेश' पत्रिका ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Maharashtra Political News
Maharashtra Political NewsSaam tv

अमर घटारे

Amravati News : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाकडून दशक्रियाचा कार्यक्रम करण्यात येतो. त्याची शोक संदेशाची पत्रिका छापून ओळखीच्या लोकांना घरोघरी वाटण्यात येते किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठविण्यात येते. अशीच शोक संदेशाची एक आगळीवेगळी पत्रिका अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यात व्हायरल होत आहे. ही चक्क राज्य व केंद्र सरकारच्या दशक्रिया आंदोलनाची ही 'शोक संदेश' पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

हुबेहुब शोक संदेशाची ही पत्रिका छापण्यात आली आहे. सदर दशक्रिया आंदोलन आम आदमी पार्टी व शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सोमवारी चांदूर रेल्वेच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे.

चांदूर रेल्वे शहरात पंतप्रधान घरकुल आवास योजनेचा निधी घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ मिळाला पाहिजे. पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसऱ्या यादीचे सुद्धा निधी मिळायला पाहिजे, चांदूर रेल्वे स्टेशनवर मुख्य रेल्वेचा थांबा पूर्ववत झाला पाहिजे.

तसेच शहरातील रेल्वे पुलाचे काम तात्काळ पूर्ण झाले पाहिजे, चांदूर रेल्वे तालुक्यात १३२ केव्ही विद्युत प्रकल्प झाला पाहिजे व विद्युतच्या लपंडापासून शहर व तालुका मुक्त करण्यात यावा, अशी मागणी या माध्यमातून आप-ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

चांदूर रेल्वे शहरातील जिल्हा परिषद (माजी शासकीय) माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक विज्ञान महाविद्यालयाला डिजिटल करून शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे. येत्या १ एप्रिल पासून इलेक्ट्रिक बिल दरवाढ होत आहे, ती दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी या मागण्यांकरिता अनेकवेळा निवेदन दिले, मोर्चे - जनआंदोलने केली. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोपही केला आहे.

सर्वसामान्य आम आदमीचे सरकारच मायबाप असते, मात्र मायबाप सरकार काहीच करत नाही. जे सरकार मोर्चे आंदोलनाला सुद्धा जुमानत नाही, अशा मेल्या मुर्दाड सरकारची 'दशक्रिया' केलीच पाहिजे.

Maharashtra Political News
Narendra Modi News: PM मोदींच्या सुरक्षेत दुसऱ्यांदा मोठी चूक; सुरक्षाकवच भेदून तरूण...

सरकारमध्ये जिवंतपणा नसल्याची लक्षणे दिसत असून त्यामुळे दशक्रिया कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ता नितीन गवळी यांनी दिली. या दशक्रिया कार्यक्रमाची शोक संदेश पत्रिका छापण्यात आली असून ते शहरात लोकांना वाटप करण्यात येत आहे. याशिवाय सोशल मीडियावर (Social Media) सुद्धा ही पत्रिका व्हायरल करण्यात आली आहे. या आगळ्यावेगळ्या शोक संदेश पत्रिकेची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com