
रत्नागिरी : रिफायनरीसाठी (refinery) सुरु असलेले सर्व्हेक्षण थांबवावे यासाठी शिवणे गावात ग्रामस्थांनी माेठे आंदाेलन (aandolan) छेडले हाेते. त्यावेळी प्रशासन आंदाेलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आराेप करीत काही जणांनी सर्व्हेक्षणाचे साहित्य जाळून टाकले हाेते. या प्रकरणी पाेलीसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (refinery project latest marathi news)
ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या बेकायदेशीर सर्वेक्षणा विरोधात गेल्या आठवड्यात शिवणे गावाच्या माळरानावर ग्रामस्थांनी आंदाेलन पुकारले हाेते. हे आंदाेलन दाेन दिवस सुरु राहिले. दुस-या दिवशी या आंदाेलनास हिंसक वळण लागले हाेते. ग्रामस्थांनी रिफायनरीच्या सर्व्हेसाठी अधिका-यांनी आणलेल्या वस्तूंची जाळपोळ केली हाेती. ज्या वाहनातून हे साहित्य आणले हाेते. त्यातील काही लाकडी सामान वाहनाच्या बाहेर काढून माळरानावर आंदाेलकांनी पेटवून दिले हाेते. या आंदाेलकांनी ही तर सुरवात आहे. पुढच्या काळात एकेकास पेटवून देऊ असा इशारा देखील दिला हाेता.
तब्बल 24 तासांनतर प्रशासनाने सर्व्हेचे काम थांबवले जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी ठिय्या आंदाेलन मागे घेतले हाेते. त्याबाबतची माहिती समितीचे अध्यक्ष अमाेल बाेले यांनी दिली हाेती.
दरम्यान रिफायनरी प्रकल्प काेकणात झाला पाहिजे अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे केली आहे. या प्रकल्पासाठी लवकरात लवकर हालचाली कराव्यात अशी मागणी राणेंनी पत्रात केली.
दरम्यान गेल्या आठवड्यात रिफायनरी पुर्व सर्व्हेक्षण थांबवणे शिवणे गावातील ग्रामस्थांना महागात पडले आहे. रिफायनरीबाबत माती परीक्षण आणि ड्रोन सर्वेक्षण रोखल्याबाबत आंदाेलकांवर राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवणे खुर्द येथील आंदोलकांच्या नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून यात रिफायनरी प्रकल्प विरोध समितीचे नेते सत्यजित चव्हाण (satyajeet chavan) यांचा देखील समावेश आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.