अखिल भारतीय साहित्य संमेलनावरून 'आप'चे शरद पवारांना पत्र

उदगीरमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनावरून आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी शरद पवारांना पत्र लिहिले आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSaam TV

औरंगाबाद: उदगीरमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनावरून आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी शरद पवारांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्राचार्य डॉ. ना.य. डोळे यांचा सन्मान व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केलीये. त्यात संमेलन आयोजकांकडून ना.य. डोळे सरांचा आयोजकाकडून यथोचित सन्मान केला जात नाही, विशेष म्हणजे उदगीरमध्ये साहित्य संमेलन ज्या परिसरात होत आहे, तो परिसर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा आहे. हे महाविद्यालय 'डोळेचे' महाविद्यालय म्हणून ओळखले जायचे. पण तिथं होत असलेल्या साहित्य संमेलनात सन्मान होत नाही, असं पत्र त्यांनी पाठवलंय. त्या पत्रात, डॉ. ना.य. डोळेंना आपण ओळखत असाल, तरी पण आपणास आठवावं म्हणून एस. एम. जोशी व डॉ.बापुसाहेब काळाच्या आग्रहाने ना. य.डोळे हे मराठवाड्यात पहिल्यांदा नांदेडला पुण्यातून आले.

Sharad Pawar
सदावर्ते आणि पत्नी जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी

पुढे बाबासाहेब परांजपेच्या बोलावण्यावरून उदगीरला आले, इथेच राहिले. जवळपास ३५ वर्षे ते उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. वे केवळ प्राचार्य होते असे नाही तर त्यापेक्षा समाज बदलाच्या पुरोगामी चळवळीचे ते नेतृत्व करीत होते. शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांच्या योगदानामुळे उदगीरला मराठवाड्यातील पुणे' संबोधले जायचे. आपल्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारने मराठवाडा विद्यापीठाचा क्लिष्ट प्रश्नाची सोडवणूक केल्यानंतर जो सामाजिक तणाव निर्माण झाला, त्या काळात डोळे सर आम्हाला घेऊन गावागावी फिरायचे. नामांतराच्या बाजूने कृतिशील भूमिका घेऊन लोकांना ती भूमिका समजावून सांगण्यासाठी फिरणारे, त्यावेळी पूर्ण मराठवाड्यात दोनच प्राचार्य होते. एक डॉ.ना.य. डोळे व दुसरे प्राचार्य सबनीस, डॉ. डोळचे साहित्य क्षेत्रात पण योगदान आहे.

ज्या 'काश्मीर फाईल्स ची चर्चा आज आहे. त्या घटना घडत होत्या तेव्हा काश्मीरवर लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे. एवढं सारे योगदान असून आत्ताचे संस्थाचालक व संमेलनाचे आयोजक यांना त्यांच्याबद्दल का असुया आहे हे माहीत नाही. त्यांचा जो यथोचित मान राखायला हवा तो त्यांनी राखला नाही. स्वागताध्यक्ष व संमेलन आयोजक संस्थेचे अध्यक्ष आपल्याच पक्षाचे आहे. आपण डॉ. ना.य. डोळे सरांच्या शिक्षणक्षेत्रातील व सामाजिक चळवळीतील योगदानाचा आपल्या उद्घाटनाच्या भाषणात उल्लेख केलात तर खूप बरे होईल. त्यांचा योग्य तो मान पण राखला जाईल. एवढी छोटीशी अपेक्षा आम्ही आपल्याकडून करू शकतो. आपण आम्हाला यासंबंधाने निराश करणार नाही की अपेक्षा, असे पत्र रंग राचुरे यांनी पाठवले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com