Crime : बापानं चिमुकल्याला फरशीवर आपटलं; उडाल्या रक्ताच्या चिळकांड्या

उपचार सुरु असताना आयुषचा मृत्यू झाला.
arjun sawant, sangli , kadegoan , police, karad, kid, husband, wife, aayush sawant
arjun sawant, sangli , kadegoan , police, karad, kid, husband, wife, aayush sawantsaam tv

Kadegoan : बायकाेच्या चारित्र्याच्या संशय घेत सुरू असलेल्या भांडणात सांगली (sangli) जिल्ह्यात एका अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या वडिलांनीच मुलाला फरशीवर आपटून त्याला ठार मारल्याची धक्कादायक घटना समारे आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (sangli latest crime news)

आयुष अर्जुन सावंत (aayush sawant) असे मृत चिमुकल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी अर्जुन अनिल सावंत (arjun sawant) याच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मुलाची आई (mother) पिंकी अर्जुन सावंत यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नाेंदवली आहे.

arjun sawant, sangli , kadegoan , police, karad, kid, husband, wife, aayush sawant
Sajjangad Satara : भरकटलेल्या बछड्याची आईशी झाली सज्जनगडावर भेट

याबाबत मिळालेली माहिती अशी - अर्जुन सावंत याचा शिवाजीनगर येथील पिंकी सावंत हिच्याशी विवाह झाला होता. सध्या अर्जुन हा शिवाजीनगर येथे राहत होता. अर्जुन याला दारूचे व्यसन असून तो वारंवार आपली पत्नी पिंकी हिच्याशी चरित्र्याचा संशय घेऊन वारंवार भांडत असे.

सायंकाळी पिंकी या कामावरून घरी आल्यानंतर अर्जुन व त्यांची मुले घरी होते. अर्जुनला घरी पाहत पिंकीने कामावर का गेला नाहीस असे विचारले. त्याचा अर्जुनला राग आला. ताे घरा बाहेर निघून गेला. त्यांनतर काही काळाने दारू पिऊन ताे घरी परतला. त्यानंतर पिंकी सोबत भांडायला लागला.

तू चांगली नाहीस असे म्हणत त्याने पिंकीला शिवीगाळ केली. तसेच पिंकी जवळ असलेल्या आयुषला हिसकावून त्याने आपल्या जवळ घेतले. हा भांडणाचा आवाज ऐकत पिंकी याचा भाऊ व भावजय धावत घरी आल्या. त्यांनी अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु दारूच्या नशेत असलेला अर्जुनने कोणाचे काही ऐकत नव्हता. त्याने आपल्याच मुलाला फरशीवर आपटले.

यामुळे चिमुकला आयुष्य रक्तबंबाळ झाला. त्याला कुटुंबियांनी तातडीने सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका रुग्णालयात उपचारासाठी नेले. दरम्यान उपचार सुरु असताना आयुषचा मृत्यू झाला. या घटनेचा पिंकीला माेठा धक्का बसला.

Edited By : Siddharth Latkar

arjun sawant, sangli , kadegoan , police, karad, kid, husband, wife, aayush sawant
Navratri : भाविकांनाे ! तुळजाभवानीच्या दर्शनास जाणार आहात ? वाचा महत्वपुर्ण निर्णय

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com