"मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर राणा दाम्पत्या विरोधात निवडणूक लढवतो"

देशात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून यांचा नाव आहे.
abdul sattar
abdul sattarSaam Tv

बीड - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मला आदेश दिला तर राणा दाम्पत्या विरोधात अमरावतीत जाऊन, रवी राणा (Ravi Rana) यांच्या विरोधात धनुष्यबाणावर निवडणूक लढवतो असे म्हणत शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राणा दाम्पत्याला आव्हान केले आहे. बीडमध्ये आयोजित प्रा.सुरेश नवले मित्र मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी सत्तार माध्यमांशी बोलत होते.

हे देखील पाहा -

पुढे बोलताना ते म्हणाले की एक लक्षत घ्या, जे राणा चाराण्या सारखी गोष्ट बोलू लागले, त्या चाराण्या वाल्यांना इतक्या मोठ्या डोंगरासमोर आव्हान करण, हे तुम्हाला मला आणि महाराष्ट्राच्या जनतेला, या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी, ज्या ज्या वेळेस जे जे सांगितलं ते ते आपण पाहतोय.

abdul sattar
हातात तलवारी घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

देशात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून यांचा नाव आहे. कोणाला तरी कुठेतरी बोलण्यासाठी माइक पाहिजे, काहीतरी विषय पाहिजे, म्हणून ते विषय सोडतात. मात्र मुख्यमंत्री यांनी मला जर अमरावती मध्ये जाऊन निवडणूक लढण्याचे आदेश दिला, तर राणा विरोधात मी शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवेल असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com