'मी पुन्हा येईल...' मंत्री अब्दुल सत्तारांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा

..म्हणून मी शिवसेनेचा बाण हातात घेतला- मंत्री अब्दुल सत्तारांनी शिवसेनेत येण्याचं सांगितलं कारण
Beed
Beed विनोद जिरे

बीड: मी पुन्हा येईल...आज भाषणाला वेळ कमी आहे, खुप बोलायचंय. त्यामुळं मी पुन्हा येईल असं म्हणत, शिवसेना (Shiv Sena) मंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना चिमटा घेतला आहे. ते बीडमध्ये (Beed) माजी मंत्री सुरेश नवले यांच्या मित्रमंडळ कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.

हे देखील पाहा-

ते म्हणाले, की आतापर्यंत माजी मंत्री सुरेश नवले यांनी खूप संघर्ष केला आहे. माझ्या संघर्षात नवले यांनी साथ दिली. त्यामुळे मित्र म्हणून आता मी नवले यांच्या संघर्षात साथ देणार आहे. त्यांच्या मित्र मंडळाच्या कार्यालयासाठी मी खारीचा वाटा उचलणार आहे, आणि ही ग्वाही देण्यासाठीचं, मी अर्जुन खोतकरांचं भाषण थोडं आवरता केलं. नसता त्यांनी आणखीन पाच मिनिटं घेतली असती.

परंतु, मी पुन्हा येईल, माझं अधूरं राहिलेलं भाषण...मला खूप बोलायचं होतं. ज्यावेळेस हजारोंच्या संख्येने आपले कार्यकर्ते मावळे येतात, त्या वेळेस काही कावळे देखील कावकाव करत असतात. असे म्हणत मंत्री सत्तार यांनी पुन्हा येईल वरून, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना, चिमटा काढत टोला लगावला आहे.

Beed
जहांगीरपुरी हिंसाचारावर कोर्ट म्हणाले- दिल्ली पोलिस 'पूर्णपणे अपयशी'

तर यावेळी शिवसेनेत का आलो ? असं म्हणत जाहीर भाषणात बोलताना, मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, की मी माझ्या मतदारसंघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वीस पंचवीस हजारांच्या मताने निवडून येत आहे. मात्र निवडणूक लढवताना मला काही जण खान- खान म्हणायचे. त्यामुळे मी आता हातात धनुष्यबाण घेतला आहे. मी शिवसेनेत येण्यापूर्वी माझ्या भागात शिवसेनेचे डिपॉझिट जप्त झालेलं आहे. साधा जिल्हा परिषद सदस्य देखील शिवसेनेचा नव्हता. मात्र मी आल्यापासून आता जिल्हा परिषद असो की पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत, या सर्व ठिकाणी शिवसेना नंबर एकवर आहे. असं म्हणत मंत्री सत्तार यांनी शिवसेनेत का आलो ? याचं कारण सांगितले. ते बीडमध्ये माजी मंत्री सुरेश नवले यांच्या मित्र मंडळ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com