BJP vs Shivsena : असे कितीही सोमय्या आले तरी शिवसेना संपणार नाही; अब्दुल सत्तारांचा घणाघात

शिवसेना ही जनतेच्या हृदयात आहे, ती किरीट सोमय्यांच्या शब्दात नाही.
BJP vs Shivsena : असे कितीही सोमय्या आले तरी शिवसेना संपणार नाही; अब्दुल सत्तारांचा घणाघात
BJP vs Shivsena : असे कितीही सोमय्या आले तरी शिवसेना संपणार नाही; अब्दुल सत्तारांचा घणाघातSaamTV

बुलढाणा : राज्यातील शिवसेना संपवण्याची स्वप्न पाहणारे असे कितीही किरीट सोमय्या आले तरी शिवसेना संपनार नाही, शिवसेना ही जनतेच्या हृदयात आहे, ती किरीट सोमय्यांच्या शब्दात नाही. जेव्हा आमच्या सोबत सोमय्या होते तेव्हा दिल्लीत होते आता कुठे आहेत. ते मुंबईच्या एका कोपरयात बसलेला आहेत तिथुन फक्त काड्या करायची काम ते करतात अशा शेलक्या शब्दांमध्ये महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमय्यांवरती टीका केली आहे.(Abdul Sattar has criticized Somaiya.)

हे देखील पहा-

तो जे वाद करतो , किवा तक्रार करतो ते त्यालाही माहित नसते असा हा किरीट सोमय्या फक्त काड्या करतो बाकी काही नाही अश्या शब्दात किरीट सोमय्यांची खिल्ली महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यानी उडविली आहे.. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बुलढाना जिल्ह्यात शेती नुकसानिची पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

BJP vs Shivsena : असे कितीही सोमय्या आले तरी शिवसेना संपणार नाही; अब्दुल सत्तारांचा घणाघात
महाराष्ट्रात माणुसकी 'सुन्न'; पालघरमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

शिवसेनेच्या नेत्यांचे घोटाळे उघड करणार

आपण शिवसेनेमधील अनेक नेत्यांचे घोटाळे उघड करणार असल्याच वक्तव्यं किरीट सोमय्या यांनी केलं होत आणि त्या वक्तव्या सारखी ते कृती देखील करत आहेत मागील काही दिवसांपुर्वी अनिल परबांविरोधात ते पुरावे गोळा करुन देत होते तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरती देखील सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com