'अब्दुल सत्तारांनी राज्यसभा निवडणुकीत खूप मदत केली, विधानपरिषद निवडणुकीतही मदत करतील'

'संजय राऊत यांच्याकडे असलेल्या गद्दारांच्या यादीत अब्दुल सत्तार एक नंबरला असायला पाहिजे'
'अब्दुल सत्तारांनी राज्यसभा निवडणुकीत खूप मदत केली, विधानपरिषद निवडणुकीतही मदत करतील'
Abdul SattarSaam Tv

लक्ष्मण सोळुंके

जालना: शिवसेनेचे (Shivsena) राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्यसभा निवडणुकीत आम्हाला मदत केली. त्यांनी केलेल्या मदतीमुळे आम्हाला राज्यसभा निवडणुकीत खूप मदत झाली असा गौप्यस्फोट भाजपचे भोकरदनचे आमदार संतोष दानवे (Santosh Danve) यांनी यांनी केला आहे. ते जालन्यात (Jalna) माध्यमांशी बोलत होते.

Abdul Sattar
'...मला त्याच्या वडिलांवर क्रश'; Urfi Javed ची 'ती' स्टोरी चर्चेत

कालच्या राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajysabha Election) सत्तार यांनी भाजपला (BJP) जशी मदत केली अशीच मदत ते विधानपरिषद निवडणुकीत भाजपला पुन्हा करतील अशी अपेक्षा देखील संतोष दानवे यांनी सत्तार यांच्याकडून व्यक्त केली आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) विरोधात मतदान करणाऱ्या गद्दारांच्या यादी आमच्याकडे असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे, यावर बोलताना अपक्ष आमदार गद्दार नसून राऊत यांच्याकडे असलेल्या गद्दारांच्या यादीत अब्दुल सत्तार एक नंबरवर असायला हवेत असा कणखर टोलाही आमदार संतोष दानवे यांनी सत्तार यांना लगावला आहे.

हे देखील पाहा-

राज्यसभा निवडणुकी आधी आमदार संतोष दानवे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करणार असल्याच सत्तार यांनी म्हटलं होतं, त्यावर ऊत्तर देतांना संतोष दानवे यांनी सत्तार यांच्यावर हा बॉंब टाकला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com