
>> सचिन बनसोडे, साम टीव्ही
Abdul Sattar About Maharashtra Politics: राहुरी कृषी विद्यापीठ येथे आयोजित परिषदेच्या उद्धाटनप्रसंग कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी जोरदार फटकेबाजी केली. कृषी क्षेत्रातील संशोधनाचा संदर्भ घेत त्यांनी आम्ही देखील कमी नाही. राजकारणात आम्ही केलेलं संशोधन काही कमी नाही असे वक्तव्य केले.
महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी कृषी विद्यापीठ येथे तीन दिवसीय संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या ५१ व्या परिषदेचे उद्घाटन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाषणादरम्यान सत्तार यांनी आपल्या खास शैलीत कुलगुरू आणि शास्त्रज्ञांसमोर जोरदार फटकेबाजी केली.
शास्त्रज्ञ असो की संशोधक, घरचा मामला कंट्रोलवाला असला तर बाहेर काम करू शकत नाही. माझ्या बायकोने सपोर्ट केल्यामुळे मी इथपर्यंत पोहचलो. तुम्ही शेतीत संशोधन करता मात्र आम्ही राजकारणात केलेली क्रांती आणि संशोधन कमी नाही असे सत्तार म्हणाले.
समोरच्या माणसाच्या पोटात, ओठात आणि बटन दाबणाऱ्या बोटात काय? याचंही संशोधन आम्ही करतो असेही सत्तार म्हणाले. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि शास्त्रज्ञांसमोर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ही फटकेबाजी केली.
कृषी विद्यापीठाच्या संदर्भात एका संस्थेच्या नावात काँग्रेस उल्लेख असल्याने सत्तार यांनी हा मिश्किल टोला लागवला. काँग्रेस नाव आलं की लफडं होतं. कुलगुरूंना लोकसभा, विधानसभा लढवायची नाहीये असे सत्तार म्हणाले. (Latest Marathi News)
यावेळी सत्तार यांनी मराठी भाषेचे गुणगान देखील केले. मला आगोदर मराठी येत नव्हती, राजकारणात आल्यावर मी काय बोलायचो ते लोकांना कळतं नव्हतं. मात्र मी मराठी शिकलो आणि आता मला हिंदी नीट बोलता येत नाही. मराठी भाषेत संभाषण करायला खूप मजा येते. (Latest Political News)
हिंदीला विरोध नाही मात्र बाहेर राज्यातून येणाऱ्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या भूमीत मराठी बोलायला शिकावे. पुढच्यावेळी तुमचे भाषण मराठीत ऐकायला आवडेल असा सल्ला परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमनी यांना अब्दुल सत्तार यांनी दिला. (Breaking News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.