Abdul Sattar News: ठाकरे-फडणवीस भेटीवर अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याने CM एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढणार? सत्तार नेमंक काय म्हणाले?

Abdul Sattar on Thackeray-Fadnavis Meet: देवेंद्र फडणवीस जे करतात ते विचारपूर्वक करतात.
Abdul Sattar News
Abdul Sattar NewsSaam TV

सचिन बनसोडे

Political News : राज्याच्या राजकारणात काल म्हणजे गुरुवारी मोठी घडामोड घडली. मागील नऊ महिन्यांपासून सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट झाली. या भेटीची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली.

विविध राजकीय चर्चांना या भेटीमुळे उधाण आलं. कारण एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाने दोन्ही नेते हसतमुखाने एकमेकांशी बोलताना दिसले. यावर आता मंत्री आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याने एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढणार हे नक्की.

Abdul Sattar News
Thackeray-Fadnavis : हाय, हॅलो, रामराम... विधानभवनात एकाचवेळी एन्ट्री; राजकारणातही उद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीस एकत्र येणार? चर्चेला उधाण

काय म्हणाले अब्दुल सत्तार?

देवेंद्र फडणवीस जे करतात ते विचारपूर्वक करतात. त्यांची इच्छा असेल तर उद्धव ठाकरेंसोबत जाऊ शकतात. दोघांनी अनेक वर्ष सोबत काम केलं आहे. त्यांच्यात कोणतीही कटूता नाही. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. ठाकरे आणि फडणवीस पुन्हा एकत्र येणार असतील तर स्वागतच करु. देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतला तर तो सर्वांना मान्य राहील, असंही अब्दुल सत्तार म्हणाले. (Political News)

Abdul Sattar News
Parrot News : पोपटाने केला मालकिणीच्या‌ हत्येचा उलगडा, 9 वर्षांनंतर दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा; काय आहे संपूर्ण प्रकरण?

फडणवीसांसोबतच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबाबत पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, पूर्वी खुलेपणा होता. आता बंद दाराआड चर्चा ही अधिक फलदायी होते असं म्हणतात. आता भविष्यात कधी झालीच आमची बंद दाराआड चर्चा झाली तर तेव्हा बोलू. मी आणि ते दोघे एकत्र प्रवेशद्वारातून प्रवेश करताना रामराम, हाय हॅलो करतो तसं झालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com