Abhijeet Bichukale : 'माझ्याकडे पैसे नाहीत त्यामुळे...' नेमकं असं का म्हणाले अभिजीत बिचुकले?

"काल मी पैसे वाटप केले जात असल्याने निवडणूक प्रक्रिया थांबवयाल हवी होती अशी मागणी केली होती"
Abhijeet Bichukale
Abhijeet Bichukale Saam Tv

सचिन जाधव

Abhijit Bichukale On Kasha Election - कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने या दोन्ही जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे.

अभिजीत बिचुकले यांनी काल (२५ फेब्रुवारी) निवडणूक आयोगाच्या कार्यालयात धाव घेत कसबा पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी निवडणुक आयोगाला तसे पत्रही दिले होते. त्यानंतर आज अभिजीत बिचकुले यांनी माझ्याकडे पैसे नाहीत त्यामुळे मला हलक्यात घेतात असे विधान केले आहे.

Abhijeet Bichukale
Sanjay Raut : 'स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केल्यावर....'; संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात

कसबा (Kasba) पोटनिवडणुकीसाठी अभिजीत बिचकुले (Abhijeet Bichukale) अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहे. यावेळी त्यांनी टर्न आणि ट्विस्ट लवकरच कळेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मतदारांनी जर शहाणपणाने मतदान केलं तर नर माझ्यासारखे उमेदवार विधानसभेत निवडून जाणार नाहीत, माझ्याकडे पैसे नाहीत त्यामुळे मला सर्वे हलक्यात घेतात असं देखील बिचुकले यावेळी म्हणाले.

"काल मी पैसे वाटप केले जात असल्याने निवडणूक प्रक्रिया थांबवयाल हवी होती अशी मागणी केली होती. मी अपक्ष उमेदवार असताना सुद्धा मला निवडणुकीचा कायदा आणि निवडणुकीची नियमावली मला माहित आहे. तिकडे भाजप (Bjp) आणि काँग्रेस आरोप करत आहेत आचारसंहिता भंग झाला आहे त्यामुळे त्यावर कारवाई व्हायला हवी आणि ही निवडणूक रद्द व्हायला हवी" अशी मागणी बिचुकले यांनी केली आहे.

Abhijeet Bichukale
CM Eknath Shinde : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक; कशी असेल शिंदे सरकारची रणनीती?

दरम्यान, आज सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत दोन्ही मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कसबा पोटनिवडणुकीत एकूण १६ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत एकूण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीची रंगत अधिकच वाढल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com