IT च्या छापेमारीनंतर अभिजीत पाटील भाजपमध्ये; दरेकरांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

'पाटील यांना साखर कारखाना चालवण्याचा अनुभव असून त्यांना मुंबई बॅंकेने देखील मदत केली आहे.'
Pandharpur Abhijit Patil And BJP
Pandharpur Abhijit Patil And BJPsaam TV

पंढरपूर: पंढरपूरचे अभिजीत पाटील (Abhijit Patil) हे माझे चांगले मित्र आणि तरूण उद्योजक आहेत. पाटील यांना साखर कारखाना चालवण्याचा अनुभव असून त्यांना मुंबई बॅंकेने देखील मदत केली आहे.

लवकरच ते सर्व चौकशीतून बाहेर येतील अशी क्लिनचीट देत अभिजीत पाटील लवकरच भाजपमध्ये येतील असा विश्वास भाजप नेते प्रविण दरेकर यांनी आज पंढरपुरात व्यक्त केला. (President of Pandharpur Vitthal Cooperative Sugar Factory Abhijit Patil)

पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या घरासह ऑफीस, कारखाने आणि पतसंस्थांवर आयकर विभागाकडून २५ ऑगस्ट रोजी (Income Tax Department) छापेमारी करण्यात आली होती. पाटील यांनी काहि दिवसांपुर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकत ते कारखान्याचे अध्यक्ष झाले होते.

पाहा व्हिडीओ -

त्यामुळे पाटील हे सध्या राजकारणामधील चर्चेतील नावं होतं. तर या छापेमारीमुळे अनेक जणांनी यामागे देखील काही राजकीय षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला होता. अशातच आज भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरेकर आज तिरंगा रॅलीसाठी पंढरपूरात आले होते. यावेळी अभिजीत पाटील आणि प्रवीण दरेकर यांची भेट झाली. भेटीनंतर दरेकर यांनी अभिजीत पाटील यांना क्लिनचीट देत ते भाजपमध्ये येतील असं वक्तव्य केलं.

Pandharpur Abhijit Patil And BJP
Shivsena : गद्दार आमदार, खासदारांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंची माेठी खेळी; माताेश्रीतून हालचाली

विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर अभिजीत पाटील हे चर्चेत आले होते. त्यांनतर त्यांच्या कारखान्यावर आणि घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या. चौकशीनंतर दुसऱ्याच दिवशी प्रवीण दरेकर यांनी अभिजीत पाटलांची भेट घेतली. या भेटीनंतर दरेकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे अभिजीत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com