अवैधरीत्या गर्भपात औषधे विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

गर्भपात आणि गुंगीकारक औषधाचा अवैधरित्या खरेदी- विक्रीच्या उद्देशाने या प्रकरणी २ जणाविरुद्ध अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या तक्रारी वरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैधरीत्या गर्भपात औषधे विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल
अवैधरीत्या गर्भपात औषधे विक्रीप्रकरणी गुन्हा दाखललक्ष्मण सोळुंके

जालना : गर्भपात Abortion आणि गुंगीकारक औषधाचा medicine अवैधरित्या खरेदी- विक्रीच्या उद्देशाने या प्रकरणी २ जणाविरुद्ध अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या तक्रारी वरून अंबड Ambad पोलिस Police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसात दुसरा गुन्हा दाखल झाल्याने, जिल्ह्यात अवैधरित्या गर्भपात आणि गुंगीकारक औषध विक्रीकर रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हे देखील पहा-

अंबड परिसरात अवैधरित्या गर्भपात आणि गुंगीकारक औषधाची विक्री करणारे २ जणांना दुचाकीवरून, विक्री करण्यासाठी येणारे असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन जालना Jalna कार्यालयाच्या औषध निरीक्षकांना खबऱ्या मार्फत मिळाली होती. अंबड- जालना महामार्गावरील पारनेर फाटा परिसरात दुचाकी वरून, दोन काळ्या बॅग घेऊन जात असताना त्यांच्या ताब्यातील बॅगची झडती घेतली असता.

त्यांच्या बॅगमध्ये गर्भपातासंबंधीत तसेच गुंगीकारक आणि पुरुषांचे कामवासना वृद्धिंगत करणाऱ्या औषधीचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आले. या बाबद अधिक चौकशी केली असता, औषधीचे खरेदी विक्रीसाठीचा परवाना नसल्याचे धक्कादायक बाब सामोर आली आहे. औषध विक्रीचा कोणतेही परवानगी नाही.

अवैधरीत्या गर्भपात औषधे विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल
जालना जिल्ह्यात एटीएम चोराचा पाठलाग करताना पोलिसांकडून गोळीबार !

तरीसुद्धा गुंगीकारक आणि गर्भपात संबंधी औषधी अवैधरित्या खरेदी विक्रीच्या उद्देशाने बाळगल्या प्रकरणी मोहम्मद शोहेब, आसिफ यांच्यासह अन्य एका विरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्ह्यात मागील काही दिवसात दुसरा गुन्हा दाखल झाल्याने, एकच खळबळ उडाली आहे की, अवैधरित्या गर्भपात आणि गुंगीकारक औषधांचे विक्री करणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय तर नाही ना ? या बाबत अधिक तपास अंबड पोलिस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com