
नांदेड : गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह (Buldhana Urban Multistate Credit Co-Operative Society) सोसायटीचे संस्थापक असलेले शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांच्या सहकारसुर्य या गोदावरी अर्बनच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) उपस्थित राहणार होते.
हे देखील पाहा :
मात्र, मुख्यमंत्री ठाकरे तर उपस्थित नव्हतेच त्याचबरोबर शिवसेनेचा (Shivsena) एकही मंत्री किंवा नेता या कार्यक्रमाकडे फिरकला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी चे (NCP) मंत्री धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांची यावेळी उपस्थिती होती. मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील हे नांदेड (Nanded) मध्ये आले मात्र त्यांनी कार्यक्रमास्थळी येणे टाळले. काँग्रेसचे (Congress) नेतेही कार्यक्रमाला आले नाहीत. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते ठळकपणे दिसत होते. मात्र शिवसेनेचे प्रमुख कुणीही नसल्याने उपस्थितांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिवसेनेच्या खासदारचा कार्यक्रम राष्ट्रवादीमय झाल्याचं एकंदरीत चित्र लपून राहिलं नाही. नितीन गडकरी ऑनलाईन उपस्थित होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे देखील ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. मात्र, काही शिवसैनिकांनी उध्दव ठाकरे यांची मुंबईत सभा असल्याने ते आले नाहीत हे सांगत होते. मात्र, शिवसेनेचा एकही मंत्री कार्यक्रमाला आला नसल्याने यामागचे कारण काय याची जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.