धक्कादायक! नोकरीचे आमिष दाखवून पुण्यातील विवाहितेवर बलात्कार

पुण्यात एका विवाहित महिलेला बीडमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचाराचा कळस गाठल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
धक्कादायक! नोकरीचे आमिष दाखवून पुण्यातील विवाहितेवर बलात्कार
धक्कादायक! नोकरीचे आमिष दाखवून पुण्यातील विवाहितेवर बलात्कारSaam Tv

बीड : पुण्यात एका विवाहित महिलेला बीडमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचाराचा married woman कळस गाठल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी तरुणाने परळीमध्ये नोकरी देण्याच्या आणि राहण्यासाठी घर देण्याच्या बहाण्याने job पीडित महिलेला बीड जिल्ह्यामधून परळी याठिकाणी घेऊन गेला होता. यानंतर आरोपीने विविध प्रकारची आमिष दाखवून पीडित महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. गुन्हा दाखल FIR होताच पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक arrested करण्यात आली आहे. गणेश कोडी असे अटक करण्यात आलेल्या २४ वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो परळी शहरात गणेशपार परिसर येथील रहिवासी आहे. संशयित आरोपी गणेश याने ३६ वर्षीय विवाहितेला नोकरी देण्याच्या आणि राहण्यासाठी घर देण्याच्या बहाण्याने फूस लावून परळी या ठिकाणी आणले होते.

हे देखील पहा-

याठिकाणी गेल्यानंतर आरोपीने १९ आणि २० नोव्हेंबर दिवशी विवाहितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित विवाहितेने परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. रविवारी पहाटे बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत संशयित आरोपी गणेश कोडी याला अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक! नोकरीचे आमिष दाखवून पुण्यातील विवाहितेवर बलात्कार
'नवरीबाई जोमात, बाकी कोमात' ! प्री-वेडिंग शूटसाठी गाठली जिम; पाहा Video

३६ वर्षीय पीडित महिला विवाहित असून ती पुण्यामधील रहिवासी आहे. तिचे मूळ गाव सोलापूर आहे. मागील काही दिवसांपासून पीडित महिला आर्थिक अडचणीचा सामना करत होती. तिला नोकरीची खूप आवश्यकता होती. पीडितेची गरज लक्षात घेत, आरोपीने 'तुला मी नोकरी लावतो, तुला राहण्याकरिता घर देतो' असे सांगून पुण्याहून बीड जिल्ह्यामधील परळी याठिकाणी आणले होते.

याठिकाणी आरोपीने पीडितेवर सलग २ दिवस बलात्कार केला आहे. या अगोदर देखील आरोपीने वेळोवेळी बलात्कार केल्याचे पीडितेने आपल्या फिर्यादीमध्ये सांगितले आहे. आरोपी गणेश कोडी याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास परळी शहर पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com