पैशावरून आईबद्दल वापरलेले अपशब्द जिव्हारी; अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

९ जानेवारी रोजी विक्रम लांब हा हॉटेल सांभाळत होता. त्यावेळी बनकरंजा येथील बळीराम लांब आणि सुभाष लांब हे दोघे हॉटेलवर आले. त्यांनी विक्रमकडे २ हजार रुपये उसने देण्याची मागणी केली.
Beed News
Beed Newsविनोद जिरे

बीड - उसने पैशा देण्यावरून आईबद्दल वापरलेले अपशब्द जिव्हारी लागल्याने एका अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडच्या (Beed) बनकरंजा गावात घडली आहे. विक्रम वसंत लांब वय 17 रा. बनकरंजा ता. केज असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. वसंत लांब यांचे कुंबेफळ शिवारात हॉटेल (Hotel) आहे. ९ जानेवारी रोजी विक्रम लांब हा हॉटेल सांभाळत होता. त्यावेळी बनकरंजा येथील बळीराम लांब आणि सुभाष लांब हे दोघे हॉटेलवर आले. त्यांनी विक्रमकडे २ हजार रुपये उसने देण्याची मागणी केली. (Beed Latest News)

हे देखील पहा -

परंतु जवळ पैसे नसल्याने विक्रमने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या बळीराम लांब व सुभाष लांब या दोघांनी विक्रम जवळ कुटुंबातील व्यक्ती आणि आई बद्दल अपशब्द वापरले. तसेच त्याला मारहाण केली. तर वडील शेतातून आल्यानंतर विक्रमने त्यांना घडलेली घटना सांगितली. वडिलांनी त्याला समजावून शांत करण्याचा प्रयत्न केला.

Beed News
पुण्यात नवे निर्बंध? पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक

मात्र आईविषयी त्यांनी वापरलेले अपशब्द त्याच्या जिव्हारी लागल्याने रात्री 9 च्या दरम्यान विक्रमने बाथरुममध्ये जाऊन खिडकीला शर्टाच्या साह्याने गळफास घेतला. या प्रकरणी वसंत लांब यांच्या फिर्यादीवरून बळीराम लांब व सुभाष लांब दोघे रा. बनकरंजा यांच्या विरुद्ध युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com