
गोंदिया : गोंदिया (gondia) जिल्ह्यातील आमगाव पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरिक्षक व एका व्यक्तीस एक लाख रूपयांची लाच (bribe) स्वीकारताना गोंदिया लाच लुचपत (acb) विभागाद्वारे रंगेहात पकडण्यात आले. या दाेन्ही संशयित आराेपींना अटक (arrest) करण्यात आली आहे. श्रीकांत पवार (वय ३७) (shrikant pawar) असे सहाय्यक पोलिस निरिक्षकाचे नाव असून अनिल सोनकनवरे (वय ३७) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. (godnia latest marathi news)
या प्रकरणातील तक्रारदार हे आमगाव येथील शेतकरी आहेत. ते यापुर्वी जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होते. दरम्यान तुम्ही सरकारी जमीन विकल्याचा अर्ज प्राप्त झाला असून तुमच्या विरोधात आमगाव पोलिसात गुन्हा दाखल होणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार यांनी फोन वरुन तक्रारदारास सांगितले. हा गुन्हा दाखल केला जाऊ नये यासाठी पाच लाख रुपये लाचेची मागणी एका व्यक्तीच्या माध्यमातून पवार यांनी केली. दरम्यान तडजोडी अंती दाेन लाख रुपये देण्याचे ठरले.
त्यानंतर तक्रारदार याने गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपक साधत याबाबत तक्रार केली. एसीबीने शहिनशा करुन सापळा रचत सहाय्यक पोलिस निरिक्षक श्रीकांत पवार व अनील सोनकनवरे याला लाचेचा पहिला हप्ता एक लाख रुपये स्वीकारताना पकडले. दाेघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एसीबीच्या धडक कारवाईची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.