Bribe : दारू-मटणसाठी लाच घेतल्याप्रकरणी प्राचार्यावर गुन्हा दाखल

या घटनेचा तपास शिवाजीनगर पाेलिस करीत आहेत.
ACB, Bribe, Latur
ACB, Bribe, LaturSaam Tv

Latur : दारू आणि मटणसाठी लाच घेतल्याप्रकरणी एसीबीच्या पथकाने लातूर (Latur) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्याला अडीच हजार रुपये घेताना पकडले. ही कारवाई एसीबीच्या (ACB) पथकाने मंगळवारी केली. (Maharashtra News)

ACB, Bribe, Latur
Positive News : कांदा लसूण विक्रेत्याचा प्रामाणिकपणा, दागिन्यांसह हजाराे रुपये केले परत

चार महिन्यांचा पगार काढण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून पेन्शनची फाईल नागपूर कार्यालयात पडताळणीसाठी पासवर्ड देऊन लवकर पाठविण्यासाठी लातूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्याने अडीच हजारांची लाच तक्रारादारास मागितली हाेती.

ACB, Bribe, Latur
Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांनी सरकारला दिली डेडलाइन

या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यामध्ये डायटचा प्राचार्य राजेंद्र नेपाळबुवा गिरी (rajendra nepalbua giri) हा अडीच हजारांची लाच घेताना एसीबीच्या सापळ्यात अलगद अडकला. याबाबत लातूर येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com