अकोल्यात भीषण अपघात; दोघे जागीच ठार तर तीन जण जखमी
अकोल्यात भीषण अपघात; दोघे जागीच ठार तर तीन जण जखमीजयेश गावंडे

अकोल्यात भीषण अपघात; दोघे जागीच ठार तर तीन जण जखमी

अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कट्यार फाटा नजीक आज दुपारच्या सुमारास कार व पिकअपच्या आमने-सामने झालेल्या एका भिषण अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

जयेश गावंडे

अकोला: अकोल्यातील Akola बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कट्यार फाटा नजीक आज दुपारच्या सुमारास कार व पिकअपच्या आमने-सामने झालेल्या एका भिषण अपघातामध्ये Accident 2 जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तर 2 गंभीर जखमी तर एक जण किरकोळ जखमी झाले आहेत.

हे देखील पहा-

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील म्हैसांग-अकोला महामार्ग क्रमांक 200 वरील कट्यार फाटा नजीक अगदी थोड्या अंतरावर येत असलेल्या वळण मार्गावर अपघात झाला. दुपारी 2 वाजताच्या सुमारास आपातापा कडून दहिहांडा कडे गॅस सिलेंडर घेऊन जात असलेली महिंद्रा पिक अप एम.एच.30 बि.डी. 0845 व म्हैसांग वरुन अकोलाकडे येत असलेल्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम.एच. 38, 5727 या दोन्ही वाहनांची आमने-सामने झालेल्या जबरदस्त धडक झाली.

यामध्ये महिंद्रा पिक अप चालक व कार चालक दोघेही जागीच ठार झाले. तर कार मधील एक पुरुष व एक महिला गंभीर जखमी झाले आहेत. तर पिक अप मधील एक जण किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. याबाबत बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे माहिती देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.

अकोल्यात भीषण अपघात; दोघे जागीच ठार तर तीन जण जखमी
Aurangabad: बालकांना विकत घेतल्याच्या घटनेनंतर जिल्ह्यात मुस्कान अभियान

या भिषण अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी 108 रुग्णवाहिका बोलाविण्यात आली होती. रुग्णवाहिका पोहचण्याआधी महिंद्रा पिक अप चालकाचा मृत्यू झाला. तर अन्य गंभीर जखमींना उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com