पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी हद्दीत अपघात; दोन ठार

धनश्री मंगल कार्यालया समोर ट्रक व कंटेनर या मध्ये झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी हद्दीत अपघात; दोन ठार
पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी हद्दीत अपघात; दोन ठारसागर आव्हाड

सागर आव्हाड

लोणी काळभोर: पुणे सोलापूर Pune Solapur महामार्गावरील कुंजीरवाडी Kunjirwadi ग्रामपंचायत हद्दीतील धनश्री मंगल कार्यालया समोर ट्रक व कंटेनर या मध्ये झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. Accident at Kunjirwadi boundary on Pune-Solapur highway

शकील इस्माईल शेख (वय- ३२, रा. बसव कल्याण,जि. बिदर, राज्य- कर्नाटक ), व अनिल अंकुश सूर्यवंशी (वय- ३५ , रा. केळगाव, ता. निलंगा, जि. लातूर ) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे असून आण्णासाहेब गणपत गायकवाड (वय- ४४, रा. मुंढवा, पुणे) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शकील शेख व अनिल सूर्यवंशी हे पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पुणे बाजूकडून सोलापूरच्या बाजूकडे कंटेनरने जात होते. त्यावेळी आण्णासाहेब गायकवाड कुंजीरवाडी हद्दीतील हे धनश्री मंगल कार्यालया समोरून पुणे बाजूकडून सोलापूरच्या बाजूला जाण्यासाठी महामार्गावरील दुभाजकावरून जात होते.

पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी हद्दीत अपघात; दोन ठार
भावी शिक्षकांसाठी महत्वाची बातमी; ६ हजार १०० टीईटी पदे भरणार

यावेळेस शकील व अनिल हे बसलेल्या कंटेनर ने पाठीमागून येऊन ट्रकला जोरदार धडक दिली. यातच शकील याचा जागेवरच मृत्यू झाला तर अनिल याचा एका खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com