अंबाजोगाईत पुन्हा अपघात! ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

बीड अंबाजोगाई शहरालगत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून पुन्हा एकदा अपघात झाला आहे.
तुषार कोपले
तुषार कोपलेविनोद जिरे

विनोद जिरे

बीड: बीड अंबाजोगाई शहरालगत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून पुन्हा एकदा अपघात झाला आहे. अंबाजोगाई - लोखंडी सावरगाव महामार्गावर ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्याने, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय.

तुषार कोपले असं अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून अंबाजोगाईलगत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) अपघाताच्या घटना घडत आहेत. महामार्गाचा रस्ता अरुंद आणि रस्त्याच्या मधोमध डिवायडर नसल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळं रस्त्याचं रुंदीकरण करून रस्त्याच्या मधे डीव्हायडर बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

तुषार कोपले
इस्त्री केलेल्या साडीचे पैसे जास्त घेतले; लॉन्ड्री चालकास लोखंडी सळईने मारहाण

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच (ता. 23) बीडमध्ये एक मोठा अपघात झाला होता. या अपघातात 7 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. भरधाव वेगात असलेल्या ट्रक व क्रूझर जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात, 7 प्रवासी जागीच ठार झाले होते. हा अपघात बीडच्या (Beed) अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील अंबाजोगाई - लातूर (Latur) महामार्गावरील सायगावच्या जवळ सकाळी झाला होता.

हे देखील पाहा-

या अपघातात लातूर जिल्ह्यातील आर्वी येथून अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी नातेवाईक जीपने जात होते. यावेळी सायगावजवळील खडी केंद्राजवळ समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली होती.

तुषार कोपले
Beed Accident: ट्रक- क्रूझर जीपचा भीषण अपघात; 7 प्रवासी जागीच ठार

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com