सोलापुरातील मांगीजवळ अपघात; तरुण जागीच ठार

रोड ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी गावकरी करत आहेत.
 Accident News
Accident NewsSaam Tv

सोलापूर : सोलापूर (Solapur) येथील अहमदनगर राज्य महामार्गावर मांगी येथील पुलावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात (Accident) होऊन एक तरुण जागीच ठार झाला आहे. वसंत मारुती शिंदे असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो देवळाली येथील रहिवासी आहे.

 Accident News
पेट्रोल पंप चालकांचे ३१ मे रोजी आंदोलन; पंप चालू असणार का?

अपघाताची माहिती मिळताच गावाकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मृत्यू पावलेला तरुण कुटुंबातील कर्ता पुरुष होता. त्यामुळे गावात सर्वत्र शोकाकुल वातावरण आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात हा अपघात झाला आहे. संबंधित रोड ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी गावकरी करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com