सोनपेठ- नरवाडी रस्त्यावर अपघात; दोन ठार, चार गंभीर जखमी

सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत अशी प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली.
सोनपेठ- नरवाडी रस्त्यावर अपघात; दोन ठार, चार गंभीर जखमी
accident news

परभणी accident news : परभणी (parbhani) जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ येथून नरवाडीकडे ऊस गाळपास घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली पाठीमागून येणाऱ्या ऑटोवर पलटी झाली. या अपघातात (accident) दाेन जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत.

accident news
एसटी संप : ठाकरे- परब फेल; पवारांमुळे गाेड बातमी मिळेल : राणा

या अपघाता मृत्यू झालेल्यांमध्ये सविता बंडू मोरे आणि यशवंत सलगर अशी नावे आहेत. हे दाेघे ऑटोतून प्रवास करीत हाेते. या अपघातात बंडू रामकिशन मोरे, गणेश लक्ष्मण गोरे, मनीषा रामेश्वर काटे व राजूबाई माळी हे गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविले आहे. काहींना बीड जिल्ह्यातील परळी आंबाजोगाई येथे पाठवण्यात आले आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत अशी प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com