NH 4 वर तेलाचा ट्रक पलटी; पाेलिस घटनास्थळी दाखल

NH 4 वर तेलाचा ट्रक पलटी; पाेलिस घटनास्थळी दाखल
accident news

सातारा : पुणे बंगळरु राष्ट्रीय महामार्गावरील pune bangalore national highway सातारा जिल्हानजीकच्या खंडाळा गावाजवळ घाट संपणाऱ्या वळणावर आज (गुरुवार) तेलाचे डबे घेऊन जाणा-या ट्रकला अपघात झाला. या अपघातात ट्रक पलटी होऊन ट्रकमधील असणारे तेलाचे डबे रस्त्यावर पडले.

accident news
Tokyo Paralympics : सुयश जाधव या संधीचे साेने करेल?

डबे रस्त्यावर पडल्याने त्यातील तेल रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणारी इतर वाहने सुद्धा घसरु लागली. त्यातील काहींना छाेट्या अपघातास सामाेरे जावले लागले. या अपघाताची accident news माहिती समजताच घटनास्थळी पाेलिस दाखल झाले.

पाेलिसांनी घटनास्थळी स्वतः रस्त्यावर पडलेले तेल बाजूला करण्यासाठी उपाययाेजना केल्या. याबराेबरच काही वाहतुकदारांनी तेलावर माती टाकून ते सुकण्यासाठी प्रयत्न केले. या अपघाताचा तपास पाेलिस करीत आहेत.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com