आरसीएफ कॉलनीत ट्रकची समोरासमोर धडक; एक जखमी

आरसीएफ कॉलनीत ट्रकची समोरासमोर धडक; एक जखमी
accident on alibag roha road

- राजेश भोस्तेकर

रायगड : अलिबाग रोहा रस्त्यावर शहराला लागून असलेल्या आरसीएफ कॉलनी येथे आज (बुधवार) पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात बर्फ घेऊन जाणारा ट्रक चालक जखमी झाला असून त्याच्यावर अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलिबाग पोलिसांकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आली. अपघातामुळे दोन्ही बाजूला एक किलोमीटर पर्यत वाहनाच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली हाेती.

accident on alibag roha road
Rally of Himalayas : तनिका शानभागची चमकदार कामगिरी

उसर येथून एचपी गॅस hp gas घेऊन ट्रक चालक हा पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास अलिबागकडे alibag येत होता. चालकाला डुलकी लागल्याने अलिबागकडून रोहाकडे जाणाऱ्या बर्फाच्या ट्रकला गॅसच्या ट्रक चालकाने चुकीच्या दिशेने येऊन धडक दिली. या अपघातात बर्फ घेऊन जाणारा ट्रक चालक हा जखमी झाला आहे. अशा परिस्थितीत अपघात करणाऱ्या चालकाने जखमी चालकाला मारहाण करून पलायन केले आहे.

दरम्यान नागरिकांनी जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले. वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. या अपघाताची accident on alibag roha road नाेंद आणि चालकाविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com