भीषण अपघातात २ ठार, ८ गंभीर; अक्कलकाेट तालुक्याचे प्रवासी

वळसंग पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
भीषण अपघातात २ ठार, ८ गंभीर; अक्कलकाेट तालुक्याचे प्रवासी
accident

सोलापूर : अक्कलकोटहून सोलापूर येथे येणाऱ्या जीपचा आज (मंगळवार) भीषण अपघात झाला. या अपघातात २ जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर वाहनाचा टायर फुटल्याने अपघात झाल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली. accident on akkalkot solapur road

accident
सांगलीत शनिवारपर्यंत जमावबंदी; संभाजी भिडेंची सभा रद्द

सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांचा संप सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना मिळेल ते वाहनातून प्रवास करावा लागत आहे. ज्या वाहनाचा अपघात झाला त्या वाहनात सुमारे २५ प्रवासी हाेते. या अपघातात जखमी व मृत्यू पावलेले हे अक्कलकाेट तालुक्यातील आहेत.

याअपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिकांनी नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. वळसंग पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com