Nashik: चुकून रेस झाली गाडी अन् मुलगी घुसली थेट ATM मध्ये

सदरची घटना ही बाजूलाच असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
Nashik: चुकून रेस झाली गाडी अन् मुलगी घुसली थेट ATM मध्ये
Nashik NewsSaam Tv

तबरेज शेख

नाशिक - सावतानगर परिसरातील महालक्ष्मी चौक मंदिरासमोर असलेले एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरूणी कडून गाडीवरील ताबा सुटल्याने दुचाकी थेट एटीएम (ATM) मध्ये घुसून तरूणीच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये तरूणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून प्राथमिक उपचारासाठी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदरची घटना ही बाजूलाच असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

हे देखील पाहा -

गौरी सैदाने वय वर्ष १८ रा. खांडे मळा, सावता नगर, सिडको असे मुलीचे नाव असून गौरी ही सकाळी ९.३० च्या सुमारास घरातून ताक घेण्यासाठी आली असता तिचा आपल्या गाडी वरील ताबा सुटल्याने तिच्या कडून गाडी थेट समोरच असलेल्या एसबीआयच्या ATM मध्ये घुसली तसेच या अपघाता मध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

Nashik News
अमरावतीत किळसवाणा प्रकार, ४५ वर्षीय व्यक्तीला विष्ठा खाण्यास भाग पाडलं

सदरची घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस स्टेशनचे कर्मचारी तेथे दाखल झाले. तसेच पोलिसांनी ही माहिती एसबीआय बँकेला कळविल्याने बँकेचे कर्मचारी देखील या ठिकाणी दाखल झाले. या अपघाता मध्ये तेथूनच जाणारे एक वयस्कर व्यक्ती देखील सुदैवाने बचावले असे प्रतक्ष्य दर्शी नागरिकांनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com