अल्पवयीन मुलीस फूस लावून, पळवून नेणाऱ्या आरोपीला अटक

तालुक्यामधील घोटा या ठिकाणी एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून, पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पुण्यावरून २४ तासात मध्ये अटक करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीस फूस लावून, पळवून नेणाऱ्या आरोपीला अटक
अल्पवयीन मुलीस फूस लावून, पळवून नेणाऱ्या आरोपीला अटकSaam Tv

मंगरुळपीर : तालुक्यामधील घोटा Ghota या ठिकाणी एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून, पळवून नेणाऱ्या आरोपीला accused पोलिसांनी Police पुण्यावरून Pune २४ तासात मध्ये अटक करण्यात आली आहे. Accused arrested for seducing a girl

हे देखील पहा-

तालुक्यामधील घोटा या ठिकाणी एका महिलेने ११ जुलै दिवशी पोलिसांत तक्रार दिली होती की, १० जुलै दिवशी फिर्यादी महिला शेताचे काम करून, घरी येत असताना फिर्यादीची १५ वर्षीय मुलगी घरी दिसलीच नाही. तीचा आजुबाजुला आणि नातेवाईकांकडे शोध घेतले असता, तिचा शोध काही लागला नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने मुलीस फूस लावून पळवून नेले आहे, अशी तक्रार देण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीस फूस लावून, पळवून नेणाऱ्या आरोपीला अटक
रेल्वेने दारूची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक

या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तपासाची चक्रे फिरविली असता, रोशन पांढरे (वय- १९) रा. घोटा याने मुलीस फूस लावून पळवून नेल्याचे स्प्ष्ट झाले आहे. सायबर सेलच्या मदतीने मुलगी आणि आरोपी हे पुणे या ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या माहितीच्या आधारे महादेव सोळंके आणि अरविंद सोनोने यांनी आरोपी व मुलीस १२ जुलै दिवशी पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास एपीआय तुषार जाधव यांचेकडे देण्यात आले आहे. Accused arrested for seducing a girl

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com