
पंढरपूर (pandharpur latest crime news) : माढा (madha) तालुक्यातील कुर्डूवाडी पोलिस (kurduwadi police station) ठाण्यातुन शाैचास जाण्याचा बहाणा करुन एका संशयित आरोपीने पोलिसांच्या (police) हातावर तुरी देऊन पलायन केल्याने एकच खळबळ उडाली. राहुल ज्ञानेश्वर माळी (rahul mali) असे पलायन केलेल्या संशयित आराेपीचे नाव आहे. (rahul mali ran away from jail in kurduwadi near pandharpur)
कुर्डूवाडी पोलिसांनी राहुल ज्ञानेश्वर माळी यास एका गुन्ह्यात गुरुवारी अटक (arrest) केली हाेती. त्याला माढा न्यायालयात नेण्यात येणार हाेते. त्यापुर्वी राहूल याने शाैचास जायचे आहे असे पाेलीसांनी सांगितले.
राहुलच्या हातात बेड्या हाेत्या. त्याने बेड्यांसह पाेलीसांना चकवा देत कठड्यावरुन उडी मारुन पाेलीस ठाण्यातूनच पलायन केले. यामुळे पाेलीस ठाणे परिसरात एकच खळबऴ उडाली. त्यानंतर पाेलीसांच्या पथकाने राहूल माळी याचा शाेध सुरु केला. दरम्यान या घटनेमुळे पाेलीसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.