सहा वर्षांनी मिळाला अल्पवयीन मुलीला न्याय; आरोपाला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

लग्नाचे अमिष दाखवून पालकांच्या कायदेशीर ताब्यातून पळवून नेले होते.
Jail
JailSaamTV

राजेश भोस्तेकर -

रायगड : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अलिबाग विशेष सत्र न्यायालयाने (Alibag Special Sessions Court) दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षेसोबत 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. राकेश संजय शिंदे असे शिक्षा सूनवलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर घटना अलिबाग तालुक्यात मांडवा हद्दीत 13 ऑगस्ट 2015 रोजी घडली होती. आरोपी राकेश संजय शिंदे याची 15 वर्षाच्या पिडीत मुलीशी ओळख होती. ती अल्पवयीन असल्याचे त्याला माहीत होते. मात्र तरीही त्याने तिला लग्नाचे अमिष दाखवून पालकांच्या कायदेशीर ताब्यातून पळवून नेले. नंतर शिर्डी, रांजणगाव, पुणे (Shirdi, Ranjangaon, Pune) येथे नेऊन तीच्यावर जबरदस्तीने शाररीक संबध प्रस्तापित केले. या प्रकरणी मांडवा पोलीस ठाण्यात Police Station गुन्हा दाखल करण्यात आला होता.. (Accused sentenced to 10 years in rape case)

हे देखील पहा -

पोलीसांनी तपास करून अलिबाग येथील विशेष सत्र न्यायालयात आरोपी राकेश संजय शिंदे याच्याविरोधात दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी विशेष अतिरीक्त सत्र न्यायाधीश -1 शईदा शेख Shaida Sheikh यांच्या न्यायालयात झाली. यावेळी शासकीय अभियोक्ता म्हणून स्मिता राजाराम धुमाळ यांनी काम पाहिले. सुनावणी दरम्यान एकुण 13 जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात पिडीत मुलगी, वैद्यकीय अधिकारी रमेश कराड, तपासिक अमंलदार यशवंत सोळसे, शिर्डी रांजणगाव आणि पुणे येथील लॉजचे मालक आणि फिर्यादी यांची साक्षी महत्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजुचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शासकीय अभियोक्ता स्मिता धुमाळ यांचा युक्तीवाद ग्राह्य धरला.

Jail
'औकातीत राहा नाहीतर गाठ माझ्याशी'; भाजप नेत्याचा आघाडी सरकारला इशारा

आरोपी राकेश शिंदे याला भादवी कलम 363, 366 अ,376 तसेच पॉस्को कायद्यातील (POSCO Act) कलम 3 आणि 4 मधील तरतुदीं आतर्गत दोषी ठरविले, आणि दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. याशिवाय 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. ज्यातील 30 हजार रुपये पिडीत मुलीला देण्याचे आदेशही न्यायाधिशांनी दिले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com